fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

पुणे जिल्ह्यात 590 खाजगी हॉस्पिटल्सना 53 हजार 9 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण


पुणे, दि. 26 : पुणे जिल्ह्यात 590 खाजगी हॉस्पिटल्सना 53 हजार 9 इतका रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करणेत आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.


26 एप्रिल 2021 अखेर 53 हजार 9 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्स व्हायल्स पुणे जिल्हयात वितरीत करण्यात आल्या आहेत. त्यापैकी रेमडिसिव्हीर इंजेक्शन्स व्हायल्स दिनांक 25 एप्रिल व 26 एप्रिल 2021 रोजी या दोन दिवसात जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना ऑक्सीजन बेडच्या संख्येनुसार रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हाईल या पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, कॅन्टोमेंट क्षेत्र व ग्रामीण क्षेत्रातील हॉस्पिटल्सला वितरीत करण्यात आल्या आहेत. संबंधित कोविड रूग्णालयांनी सदरचा औषध साठा प्राप्त करून घेणेकामी रूग्णालयाच्या लेटर हेडवर सही शिक्क्यासह प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. याबाबतची खातरजमा करून घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे सुयोग्य वितरण सदर आदेशाचे दिनांकास मुदतीत व शासकीय,वाजवी दरात करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना थेट साठा उपलब्ध होत आहे.


पुणे जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा विचारात घेता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे दिनांक 11 एप्रिलपासून २४ X ७ रेमडिसिव्हीर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. रेमडिसिव्हीरचा काळाबाजार रोखण्याच्या अनुषंगाने शहरी भागात 6 भरारी पथके व ग्रामीण भागात 12 भरारी पथके तहसिलदार यांचे नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आली असून त्यांचे मार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट व वितरक यांचेकडील रेमडिसिव्हीरची उपलब्धता व सुयोग्य वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. त्याचसोबतच पुणे, पिंपरी महानगरपालिका, पुणे छावणी परिषद, पुणे ग्रामीण, नगरपालिका प्रशासन व नगर पंचायतसह आयुक्त औषध व प्रशासन यांनी प्राधिकृत केलेल्या आरोग्य अधिकारी यांनी नियंत्रण करणेबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. दररोज प्राप्त झालेल्या रेमडिसिव्हीर इंजेक्शनचे रूग्णालयनिहाय वाटप करण्यात येवून केलेल्या वाटपाची हॉस्पिटलनिहाय रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या संख्येसह व वितरकाच्या नाव व मोबाईल क्रमांकासह यादी नागरीकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय पुणेच्या pune.gov.in व https://.pune.gov.in/corona-virus-updates/. या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading