fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

१ मे पासून १८ वर्षापुढील सर्वांना काेराेना प्रतिबंधित लस. मात्र लसीचा दुसरा डाेस देण्यासाठी प्राधान्य – मुरलीधर माेहाेळ

पुणे : केंद्र सरकारच्या निर्णयानुुसार १ मे पासून अठरा वर्षापुढील सर्वांनाच काेराेना प्रतिबंधित लस देण्यास सुरुवात हाेणार आहे. तेव्हा ज्येष्ठ नागरीकांना लसीचा दुसरा डाेस देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे अशी माहीती महापाैर मुरलीधर माेहाेळ यांनी पत्रकार परीषदेत दिली. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी गेल्या दाेन महीन्यात माेठ्या प्रमाणावर आराेग्य सुविधा उपलब्ध केल्याचा दावाही त्यांनी केला.


केंद्र सरकारने १ मेपासुन सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर केला असुन, यामुळे शहरांतील ज्येेष्ठ नागरीक आणि ४५ वर्षापुढील ज्या नागरीकांनी लसीचा पहीला डाेस घेतला आहे. त्यांना दुसरा डाेस मिळण्यासंदर्भात शंका निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात महापािलकेच्या प्रशासनाबराेबर चर्चा केल्यानंतर महापाैर माेहाेळ यांनी पत्रकार परीषदेत निर्णयाची माहीती दिली. यावेळी उपमहापाैर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बीडकर, शहर सुधारणा समिती अध्यक्ष आनंद रिठे आदी उपस्थित हाेते.

एक मे पासून शहरांत सर्वांना लस दिली जाणार असली तरी , ज्या ज्येष्ठ नागरीक, ४५ वर्षापुढील नागरीकांनी लसीचा पहीला डाेस घेतला आहे. त्यांना दुसरा डाेस देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. सध्या शहरांत महापािलकेच्या १०४ आणि खासगी रुग्णालयाच्या ७३ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहे. सध्या महापािलकेकडे राज्य सरकारकडून लस येत आहेत. या लसीचा पुरवठा पुढे लसीकरण केंद्रांना केला जाताे. परंतु, १ मेपासून खासगी रुग्णालयांना महापािलका लस पुरवठा करणार नाही. या खासगी रुग्णालयांना खुल्या बाजारातून लस विकत घेण्याची मुभा असणार आहे. यामुळे महापालिकेच्या लसीकरण केंद्रांत जास्त प्रमाणात लस उपलब्ध हाेण्यास मदत हाेणार आहे. गेल्या अठ्ठावीस दिवसांत सुमारे ४ लाख डाेस नागरीकांना दिले गेले आहेत.


जानेवारी महीन्यापासून पुणे शहरांत लसीकरणाला सुरुवात झाली. आराेग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, साठ वर्षापुढील नागरीक, ४५ ते ५९ वर्षाचे नागरीक असे एकुण ७ लाख ७० हजार ३३३ जणांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये १ लाख ३३ हजार ९०९ नागरीकांनी दुसरा डाेस घेतला आहे.

महापाैर निधीचा उपयाेग हा काेराेना उपचारासाठीच खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातंर्गत पाच रुग्णवाहीका घेण्यात आल्या आहेत. नायडू रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा उभी केली जाणार आहे, तसेच बाणेर येथे रुग्णालय उभे केले जात आहे, पाच विद्युत शवदाहीनी उभारल्या जाणार आहेत, शंभर व्हेंटीलेटर खरेदी केली जाणार आहे, ड्युरा सिलेंडरही खरेदी करणार आहे.


आकडेवारी काय सांगते

लसीकरण : पहीला डाेस : दुसरा डाेस घेणाऱ्यांची संख्या

-आराेग्य विभाग : ५७ हजार ८५७ : ४१ हजार ८९२ -फ्रंटलाईन वर्कर : ६२ हजार २५७ : १७ हजार १०६

-६० वर्षापुढील : २लाख ६२ हजार ६५७ : ५७ हजार ४१८

-४५ ते ५९ वर्ष गट : २ लाख ३६ हजार १६० : १७ हजार ४९३

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading