fbpx
Monday, June 17, 2024
LIFESTYLE

या ३ पदार्थांसह तुमची प्रतिकारशक्ती वाढवा!

 भारतभरातील लोक या नवीन जीवनशैलीला स्वीकारत असताना प्रतिकारशक्ती हा नवीन युगाचा मंत्र ठरला आहे. त्याचबरोबर पावसाळ्याची सुरूवात होत असताना संसर्ग आणि फ्लू होण्याची शक्यताही वाढीस लागते. त्यामुळे मग आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्यक्तीला काय करता येईल?

त्याचे उत्तर खूप सोपे आहे. योग्य आहाराचे सेवन करा! उत्तम पोषण आणि निरोगी जीवनशैली कायमच महत्त्वाची आहे. परंतु आता जास्त महत्त्वाची आहे कारण पोषणमूल्यांनी युक्त आहार एक उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास उपयुक्त ठरतो. पोषण आणि पिलेट्स तज्ञ माधुरी रूईया यांच्या मते तुम्ही तुमच्या आहारात या तीन पदार्थांचा समावेश तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी केलाच पाहिजे.

पोषणयुक्त बदाम: एक चांगले फूड जे व्यक्तीच्या आहारात सहजपणे समाविष्ट केले जाऊ शकते ते म्हणजे बदाम होय. ते पोषणाने युक्त आहेत, त्यांनी पोट भरले जाते आणि ते एक सकस व चविष्ट स्नॅक ठरतात. त्याचबरोबर त्यात विविध पोषक घटक समाविष्ट आहेत, जे प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी ओळखले जातात. उदाहरणार्थ, बदाम व्हिटॅमिन ई ने युक्त आहेत. ते श्वसनाच्या प्रतिकारशक्तीच्या कार्यासाठी अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करतात. व्हिटॅमिन ई विषाणू आणि जीवाणूंनी होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण देण्यासाठीही ओळखले जाते. त्याचबरोबर बदाम कॉपरने युक्त आहेत. कॉपरमुळे प्रतिकारयंत्रणा योग्य पद्धतीने काम करण्यात योगदान मिळते.

 बदाम हा झिंकचा एक उत्तम स्त्रोतही आहे. झिंक आपल्या प्रतिकारयंत्रणेत मध्यवर्ती भूमिका बजावते आणि आपल्या शरीरातील पेशींच्या उत्तम विकासासाठी तसेच कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती, न्यूट्रोफिल्स आणि नैसर्गिक किलर पेशींच्या वाढीला चालना मिळते.2 बदामांमध्ये सापडणारा आणखी एक महत्त्वाचा पोषक घटक म्हणजे लोह म्हणजेच आयर्न आहे. आयर्न प्रतिकारशक्तीच्या आणि विशेषतः कोणत्याही संसर्गाला विशिष्ट प्रतिसाद देण्याशी संबंधित असलेल्या लिम्फोसाइट्सच्या वाढीत तसेच पक्वतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading