कोरोना – राज्यात शनिवारी विक्रमी ६७ हजार १२३ नवीन रुग्ण; ४१९ जणांचा मृत्यू
मुंबई, दि.१७ – महाराष्ट्रात मागील बुधवारपासून लॉकडाऊनसदृश निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्याऐवजी वाढ होताना दिसत आहे. शनिवारी राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. शनिवारी राज्यात ६७ हजार १२३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. त्यामुळे राज्यात आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३७ लाख ७० हजार ७०७ झाली असून राज्यात सध्या ६ लाख ४७ हजार ९६६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३५,८०,९१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७,७०,७०७ (१५.९९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,७२,५८४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये असून २५,६२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
शनिवारी राज्यात ४१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९ टक्के इतका आहे. आतापर्यंत एकूण ५७ हजार ९७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच मागील २४ तासांत ५६ हजार ७८३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ३० लाख ६१ हजार १७४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.१८ टक्के इतके आहे.
शनिवारी मुंबईमध्ये ८८११ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या ५ लाख ७१ हजार ०१८ इतकी झाली आहे. तसेच शनिवारी कोरोनामुळे ५१ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत एकूण १२ हजार ३०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
पुणे शहर
- दिवसभरात ६००६ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात ५६०९ रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात करोनाबाधीत ७५ रुग्णांचा मृत्यू. २१ रूग्ण पुण्याबाहेरील.
- १२३६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३६०८०३.
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५४९६७.
- एकूण मृत्यू -६०५६.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २९९७८०. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २४५०६.
