Saturday, June 13, 2026
PUNE

एलसॅट-इंडिया २०२१ परिक्षेच्या दुसऱ्या सत्राची नोंदणी सुरू : एलएसएसी ची घोषणा

पुणे,दि. 16 –एलसॅट-इंडिया २०२१ या परिक्षेच्या दुसऱ्या सत्राची अंमलबजावणी सुरू होईल व ती त्यापुढे अनेक दिवसांच्या कालावधीत घेण्यात येईल, अशी घोषणा द लॉ स्कूल अॅडमिशन कौन्सिल (एलएसएसी) या संस्थेने आज येथे केली. उमेदवारांचा प्रामाणिकपणा व वैधता यांबाबत खबरदारी घेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेली रिमोट प्रोक्टरिंग  पद्धत वापरणाऱ्या, या सिद्धहस्त ऑनलाईन परीक्षा यंत्रणेचा पुन्हा एकदा एलसॅट-इंडिया साठी उपयोग करण्यात येत आहे. ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची मोठी संख्या लक्षात घेता, ती अनेक दिवसांच्या कालावधीत, वेगवेगळ्या वेळांमध्ये घेण्यात येणार आहे. या परिक्षेसाठी नावनोंदणी करण्याची मुदत दि. ४ जून २०२१ पर्यंत आहे.

एलसॅट-इंडिया २०२१  साठी नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी discoverlaw.in/register-for-the-test. या पोर्टलला भेट द्यावी. नोंदणीचा कालावधी संपल्यावर उमेदवारांना वेळापत्रकाचे तपशील व परीक्षा कशी द्यायची याच्या सूचना कळविण्यात येतील; जेणेकरून त्यांना परिक्षेचा अनुभव अखंडित स्वरुपात घेता यावा.

भारतातील अनेक नामांकित विधि महाविद्यालये आपल्या प्रवेश परिक्षांसाठी एलसॅट-इंडिया चा वापर करतात. भारतातील अव्वल दर्जाच्या अनेक विधि महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ही एलसॅट-इंडिया ची एकच परीक्षा देता येते. त्यातून विद्यार्थ्यांचा वेळ, मानसिक ताण व पैसे यांची बचत होऊन त्यांना अनेक संधी व पर्याय उपलब्ध होऊ शकतात. आपल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये एलसॅट-इंडिया ही परीक्षा प्रमुख निकष म्हणून समाविष्ट करणाऱ्या महाविद्यालयांची यादी https://www.discoverlaw.in/associated-law-college या वेबसाईटवर पाहता येते.

या परिक्षेची तयारी करण्यामध्ये विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने एलएसएसी ने एलएसएसी लॉप्रेप हा प्लॅटफॉर्म या वर्षाच्या सुरुवातीस सादर केला आहे. एलएसएसी लॉप्रेप मध्ये विद्यार्थ्यांसाठी सराव-परिक्षांची एक व्यापक लायब्ररी अंतर्भूत करण्यात आली आहे. यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परिक्षेची अनुभूती मिळेल आणि परिक्षेचा डिजिटल इंटरफेस  वापरण्याची सवय होईल. एलएसएसी लॉप्रेप  हा गेल्या ७० वर्षांतील परिक्षांविषयीचे संशोधन व अनुभव यांच्यावर आधारीत एक डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. विद्यार्थ्यांना एलसॅट-इंडिया व त्याही पलिकडचे यश मिळविण्याकरीता उपयोगी पडतील, अशी निर्णायक व विश्लेषणात्मक विचारपद्धतींची तंत्रे शिकविण्याच्या दृष्टीने या प्लॅटफॉर्मची रचना करण्यात आली आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading