Saturday, May 30, 2026
ENTERTAINMENT

चर्चा तर होणारच : फास्ट अँड फ्युरिअस ९ चा ट्रेलर लॉंच

प्रत्येकाला सध्या घरात थांबावे लागले आहे. अशा परिस्थितीत आपल्या सर्वांनाच हवी असलेली उर्जा F9 या अत्यंत प्रतिक्षित चित्रपटाच्या ट्रेलरच्या निमित्ताने इंटरनेटवर अवतरली आहे. फास्ट अँड फ्युरिअस फ्रेन्चायझीच्या चित्रपटकर्त्यांची ही नवी कलाकृती आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना खूपच उत्कंठा होती. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील अत्यंत साहसी स्टंट्स पाहून प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे आणि या चित्रपटातील स्टंट्स पाहून प्रेक्षक स्तिमित होणार आहेत हे निश्चित. आणि ज्यांना वाटत असेल की, हे एवढ्यापुरतेच आहे त्यांच्यासाठी चांगल्या आणि वाईटामधील ही लढाई अजूनच वैयक्तिक स्वरुपात पाहायला मिळणार आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीला डॉमनिक टोरेटो (विन डिझेल) आणि जेकब टोरेटो (जॉन सिना) यांच्यातील पाठलाग दिसतो. यात जेकब आपला भाऊ असल्याचे डॉमनिक सांगतो. हे दोघे भाऊ कायद्याच्या दोन विरुद्ध बाजूंना उभे असतात आणि दोघेही समोरासमोर उभे ठाकतात आणि त्यांच्यापैकी कुणीतरी एकच जगणार असे दिसत असते. एकीकडे हे दोघे वाहवा मिळवत असताना डॉमची गँगसुद्धा मृत्यूला चकवा देणाऱ्या अॅक्शन करताना दिसते, ज्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या ट्रेलरमध्ये एक व्यक्तिरेखा परतली आहे. ही व्यक्तिरेका पुन्हा कधीच दिसणार नाही, असे आपल्याला वाटले होते. याहून अधिक काही आम्ही तुम्हाला सांगत नाही, त्यामुळे तुम्ही हा ट्रेलर स्वतः पाहा.

F9 चे दिग्दर्शन जस्टिन लिन याने केले आहे, ज्याने डॅनिअल केसीसोबत या चित्रपटाची पटकथासुद्धा लिहिली आहे. द फेट ऑफ द फ्युरिअस (२०१७) या चित्रपटाचा हा सिक्वल, मुख्य चित्रपटाचा नववा भाग आणि फास्ट अँड फ्युरिअस फ्रेन्चायझीचा १० वा पूर्ण लांबीचा चित्रपट आहे. विन डिझेलसोबत F9 मध्ये मायकल रॉड्रिग्ज, टायरेस गिब्सन, जॉर्डाना ब्रेवस्टर, ख्रिस ब्रिजेस (ऊर्फ ल्युडाक्रिस), नथाली इमॅन्युएल, हेलन मिरेन, चार्लीझ थेरॉन यांच्या भूमिका आहेत. नव्या चेहऱ्यांमध्ये जॉन सिना कार्डी बीसह दिसणार आहे आणि या ताऱ्यांच्या मांदियाळीत ओझुना हा नवा चेहरा दिसणार आहे. 

F9च्या साहसी आणि धाडसी सफरीवर जाण्यासाठी तयार राहा कारण हा चित्रपट लवकरच इंग्लिश, हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading