महापालिका रिपब्लिकन पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेविका फराजना अयुब शेख

पुणे, दि. ७ – पुणे महापालिका रिपाइं गटनेतेपदी फराजना अयुब शेख यांची आज  निवड करण्यात आली .त्या नागपूर चाळ-फुलेनगर   याप्रभागातून निवडून आल्या आहेत .त्यांची गटनेतेपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे . त्यांचे पती आयुब शेख हे माजी नगरसेवक व शिक्षण मंडळ सभासद म्हणून अतिशय उत्तम असे काम केले  असून रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे ते प्रदेशादयक्ष आहेत.  महाराष्ट्र भर अल्पसंख्याक  समाजाचे  फार मोठे संघटन त्यांनी उभे केले आहे .मुस्लिम बँकेत ते गेली 30 वर्षांपासून संचालक व इतर पदावर त्यांनी कार्य केले आहे . तसेच इतरही  सामाजिक ,शैक्षणिक संस्थात  ते बऱ्याच वर्षांपासून  यशस्वी कार्य करीत आहेत .तसेच महाराष्ट्रातिल अनेक शैक्षणिक संस्थांशी ते   निगडित आहेत .त्यामुळे त्यांच्या आणि फराजना शेख यांच्या कार्याची दखल घेऊन  आज  फरजाना शेख यांची पुणे महापालिकेच्या रिपाइं गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे . 

Leave a Reply

%d bloggers like this: