अमनोरा टाऊनशीपमध्ये कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन

पुणे, दि. ७ – कोरोनाच्या काळात प्रत्येकाने मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे व स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक आहे.  तसेच ४५ वर्षे वयाच्या वरील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार चेतन तुपे यांनी केले आहे.

पुणे महापालिकेच्या वतीने अमनोरा टाऊनशीप येथे कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपमहापौर निलेश मगर, मंगेश तुपे, अमनोरा सिटी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल काळे, सहाय्यक आयुक्त हडपसर विभागीय कार्यालयाचे बनकर आदी उपस्थित होते.

साडे सातरा नळी, हडपसर, अमनोरा टाऊनशीप मधील रहिवाशांना या केंद्राचा लाभ होणार आहे. पहिल्या दोन दिवसात सुमारे २११ नागरिकांनी याचा लाभ घेतला.

Leave a Reply

%d bloggers like this: