fbpx
Saturday, April 27, 2024
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – आज राज्यात सर्वाधिक ५९ हजार ९०७ नवीन रुग्ण रुग्णांची, ३२२ बळी

मुंबई – राज्यात आज तब्बल ५९ हजार ९०७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. आज रुग्णांची सर्वाधिक वाढ झालेली असून मृतांचा आकडाही वाढला आहे. गेल्या २४ तासांत 322बाधितांच्या मृतांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढला आहे.

गेल्या २४ तासांत ५९ हजार ९०७ रुग्णांची वाढ झाली असून ३० हजार २९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यतं २६ लाख १३ हजार ६२७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर, राज्यात एकूण 50 हजार 1559 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.36% झाले आहे.

मुंबईत १० हजार ४२८ रुग्णांची वाढ झाल्याने मुंबईतील एकूण बाधितांचा आकडा ४ लाख ८२ हजार ७६० वर पोहोचला आहे. तर, आज ६ हजार ७ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत ३ लाख ८८ हजार ११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज २३ बाधितांच्या मृतांची नोंद झाल्याने मुंबईत एकूण ११ हजार ८५१ बाधितांनी कोरोनामुळे आपला प्राण गमावला आहे. त्यामुळे सध्या मुंबईत ८१ हजार ८८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या मुंबईत ८० टक्के रिकव्हरी रेट आहे. तर डबलिंग रेट ३५ दिवसांवर आला आहे.

मुंबईप्रमाणेच कल्याण -डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातही कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. गेल्या २४ तासांत या क्षेत्रात १ हजार ७८२ नवे रुग्ण सापडले आहेत. सध्या या क्षेत्रात १२ हजार ८७ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ७५ हजार १६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज ९८७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज ३ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

ठाण्यातही आज १ हजार ६१९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ११११ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच आज ५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ठाण्यात कोरोनामुळे १ हजार ४२२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर १३ हजार ४८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे कोरोना अपडेट

  • दिवसभरात ५६५१ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ४३६१ रुग्णांना डिस्चार्ज.
  • करोनाबाधीत ५४ रुग्णांचा मृत्यू. १३ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • ९५७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३०५३७२.

-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४६०७१.

  • एकूण मृत्यू -५५६७.

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २५३७३४.

  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २६१२०.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading