अफगाण वाणिज्य दूतावास प्रमुखांची अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसला भेट
पुणे, दि. ३० – अफगाणिस्तानच्या मुंबईतील वाणिज्य दूतावास प्रमुख झाकिया वार्डाक यांनी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसला भेट देऊन विद्यार्थी ,प्राध्यापकांशी संवाद साधला.
अफगाणी विद्यार्थ्यांची प्रगती पाहून विचारपूस करणे,अफगाणिस्तान मधील व्यवस्थापनशास्त्रविषयक शैक्षणिक संस्थांशी सहकार्य कराराची चाचपणी करणे आणि व्यवस्थापनशास्त्र शिक्षणाला अफगाणमध्ये प्रोत्साहन देणे याबाबत चर्चा झाली.अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसचे प्रभारी संचालक डॉ. रोशन काझी यांनी स्वागत केले.
