घर तिथे रिपब्लिकन सेना अभियानाला परभणी जिल्ह्यातुन सुरुवात
प्रसंगी पोलिसांची छातीवर गोळी घेण्याची तयारी ठेवा….पण,भिमजयंती निघणारच – किरण घोंगडे
परभणी – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती थाटामाटात साजरी करणारच असा निर्धार सर्व स्तरातून भिमसैनिकांनी केला आसल्याचे दिसते, रिपब्लिकन सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा हिंगोली जिल्हाप्रमुख किरण घोंगडे यांचा परभणी जिल्हा दौरा परभणी जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता.
या दौऱ्यात निवृत्ती वाघमारे, संतोष कांबळे, नामदेव कनकटे, राष्ट्रपाल वाघमारे, भारत कनकटे, पंजाब राठोड, पांडु राठोड सहभागी झाले होते. तर पुर्णा तालुक्यातील धानोरा, मिरखेल, फुलकळस, बलसा या गावात बैठका घेऊन रिपब्लिकन सेनेत सहभागी होवून गाव तिथे शाखा व घर तिथे रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे. व नेते आंनदराज आंबेडकर साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी आपण काम केले पाहिजे व येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती थाटामाटात साजरी करा व प्रसंगी पोलीसांची छातीवर गोळी घेण्याची तयारी ठेवा आसे आवाहन राज्य कार्यकारिणी सदस्य किरण घोंगडे यांनी बैठकीत केले.
परभणी जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी म्हणाले की, जातीवादी सरकार जाणून- बुजून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आलीच की कसा कोरोना येतो ? गेले सहा महिने कुठे गेला होता करोना ? तुमची नौटंकी आता चालू देणार नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती धुमधडाक्यात साजरी करा कोणाच्या बापाला भिनयाची गरज नाही
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करत असताना गुन्हे दाखल होत असतील तर होऊ द्या ना आणि यान जातीवादी सरकारला दाखवून द्या. भीत नाय कोणाच्या बापाला ही भिमाची पोर.