स्थानिक व्यावसायिकांना वेबसाइट बनवण्यासाठी प्रेरित करण्यासाठी GoDaddy ने सुरू केली विशेष मोहीम

पुणे –  दैनिक व्यवसाय करणारे आणि उद्योजकांना सामर्थ्यवान बनविणारी कंपनी GoDaddy Inc. (NYSE: GDDY) ने आज एक नवीन अभियान सुरू केले आहे. जे देशातील छोट्या स्थानिक व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायांसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार करण्यास प्रोत्साहित करेल. सरकारच्या ‘Vocal for Local’ मिशन ला हातभार लावण्यासोबतच GoDaddy चे उद्देश आहे की भारतातील स्थानिक व्यवसायांना त्यांच्या वेबसाइट्स सहज आणि परवडणार्‍या किंमतीत तयार करण्यात मदत केली जावी.

या मोहिमेसाठी GoDaddy भारतातील सध्याच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आणि जगातील नामांकित क्रिकेटपटूंपैकी एक एमएस धोनी यांच्याबरोबर काम करेल. या मोहिमेमध्ये एमएस धोनी “बिझनेस भाई” च्या भूमिकेत दिसणार आहे, जो एक व्यवसाय गुरु असेल. तो छोट्या स्थानिक व्यवसायांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहित करेल. जेणेकरुन लहान व्यवसाय मोठ्या संख्येने ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली ऑनलाइन उपस्थिती दर्शवू शकतील. स्थानिक भाषेला पाठबळ देण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेनुसार ही मोहीम एकूण सात भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होईल. यात हिंदी, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, तामिळ आणि तेलगू इत्यादी भाषांचा समावेश असेल. स्थानिक भाषांच्या या मोहिमेमुळे देशातील अनेक भौगोलिक क्षेत्रातील भारतीय लघु उद्योग मालक आणि उद्योजकांमध्ये सहज संदेश पोहोचण्यास मदत होईल.

या मोहिमेद्वारे GoDaddy मध्ये सामील होताना, एमएस धोनी म्हणाले, “एक महत्वाकांक्षी आणि घरगुती उद्योजक म्हणून मला हे चांगल्या प्रकारे समजले आहे की व्यवसायांची ऑनलाइन उपस्थिती असणे पूर्वीपेक्षा आज जास्त महत्वाचे आहे. कठीण काळात डिजिटल अस्तित्त्व नसल्यामुळे अनेक स्थानिक छोट्या  उद्योगांनी जगण्यासाठी आणि स्वतःची वाढ करण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. व्यवसायाच्या या आव्हानात्मक खेळपट्टीवर सामना जिंकणार्‍या कामगिरीसाठी योग्य ऑनलाइन व्यासपीठ आणि समाधान आवश्यक आहे. पुन्हा एकदा GoDaddy शी कनेक्ट झाल्याचा मला खूप आनंद झाला आहे. व्यवसायाच्या ऑनलाइन उपस्थितीसाठी मी देशभरातील स्थानिक उद्योजकांना प्रेरणा देण्याचा आणि त्यांचा व्यवसाय डिजिटलपणे वाढविण्यात मदत करण्यास प्रयत्न करणार आहे. “

या मोहिमेचा एक भाग म्हणून GoDaddy मुंबई-आधारित क्रिएटिव्ह एजन्सी Tilt Brand Solutions बरोबर काम करत आहे, जी मजेशीर आणि वेगळ्या प्रकारच्या टिव्ही जाहिराती (TVCs) तयार करत आहे. या जाहिरातींमध्ये, एमएस धोनी एक “बिझनेस भाई” म्हणून दिसेल. तो GoDaddy च्या माध्यमातून ऑनलाइन साधन आणि समाधानासह वेबसाइट तयार करुन लहान स्थानिक व्यवसायांना “मेक इन इंडिया आणि संपूर्ण भारतात विक्री” करण्यास प्रोत्साहित सुद्धा करेल. स्थानिक छोट्या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु असलेले सरकारचे “आत्मनिर्भर भारत” अभियान आणि GoDaddy च्या मोहिमेच्या माध्यमातून कथा सांगून उद्योजकांना दररोज ऑनलाइन येण्यासाठी प्रोत्साहित सुद्धा केले जाईल.

या मोहिमेबद्दल आणि एमएस धोनीबरोबरच्या आपल्या भागीदारीविषयी बोलताना, GoDaddy India चे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष निखिल अरोरा म्हणाले की, आमच्या प्रसिद्ध “बिझनेस भाई” मोहिमेच्या फेज 3 मध्ये एमएस धोनी आमच्यात सामील झाल्याने आम्हाला फारच आनंद झाला आहे. क्रिकेटर आणि भारतीय उद्योजक म्हणून यशस्वी व्यावसायिक प्रवासाचे एक उदाहरण म्हणजे एमएस धोनी. तो भारताच्या विश्वासू आवाजाचे प्रतिनिधित्व करतो. स्थानिक पातळीवरील आपल्या कनेक्शनसह, एमएस धोनी भारतीय लघु व्यावसायिकांना मोठे स्वप्न बघण्यास नेहमीच प्रभावित करतो. आमचे उद्दीष्ट आहे की धोनीबरोबर काम करून, देशातील सर्व स्थानिक व्यावसायिकांना त्यांच्या ऑनलाइन उपस्थितीने त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी प्रेरित करणे आणि ते निरंतर चालू ठेवणे.

ते पुढे म्हणाले, “2020 हे वर्ष सर्वांसाठी, खासकरुन भारतातील लघुउद्योगांसाठी एक आव्हानात्मक वर्ष राहिले. GoDaddy वर आम्ही व्यवसाय आणि उद्योजकांना ऑनलाइन येण्यास आणि त्यांची उपस्थिती नोंदविण्यात मदत करण्यावर भर देत आहोत. ‘Vocal for Local’ या अभियानाबद्दल पुढे बोलताना ते म्हणाले, “उदयोन्मुख भारताला आमच्या विभिन्न सेवांच्या माध्यमातून डिजिटल स्वरुपात बदल घडवून आणण्यासाठी मदत करण्याकरिता छोट्या स्थानिक व्यवसायांना ऑनलाईन हजेरी लावण्याविषयी शिक्षण देण्याचे आमचे ध्येय आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: