Thursday, September 3, 2026
ENTERTAINMENT

‘स्वांग’ ही गूढ आणि रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

 लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेते अनुष्का सेन, हितेन तेजवानी, मानसी श्रीवास्तव, अॅलन कपूर आणि अनुराग शर्मा ही कलाकार मंडळी हंगामा प्ले’च्या आगामी ओरीजनल शो स्वांग’मध्ये झळकणार आहेत. ही गूढ आणि रहस्यमय मालिका गुन्हेविषयक थरार घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन बहिणींच्या धक्कादायक रहस्याने त्यांच्या राहत्या लहानशा शहरात खळबळ माजते असे कथासूत्र असेल.  

अनुष्का सेन हिच्या झांसी की रानीमधील व्यक्तिरेखेचे मोठे कौतुक झाले होते. तसेच बालवीर, महादेव आणि समीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या लिहाफ या सिनेमात तिच्या अभिनयाची छाप दिसली. ही अभिनेत्री म्हणते की, “एखाद्या अभिनेत्या/अभिनेत्रीचा सहभाग गुणवत्तापूर्ण प्रकल्पांत असेल तर हा अनुभव सुखावणारा असतो. मग कलाकृती ही एखादी मालिका, सिनेमा किंवा वेब सिरीज असो; त्यांना आव्हानात्मक भूमिका स्वत:च्या सर्वोत्तम क्षमतेने निभावणे शक्य होते. स्वांग’ची संकल्पना मनोरंजक असल्याने मी होकार दिला. याचे निवेदनात्मक कथानक जबदरस्त पकड असलेले होते. ज्यामुळे प्रेक्षक नक्कीच गुंतून राहतील. मी मध्यवर्ती भूमिका असलेल्या मुस्कानची भूमिका करण्यासाठी अतिशय उत्सुक असून ती स्वांगचे चक्रव्यूह भेदते. ही मालिका माझ्या चाहत्यांकरिता खूपच मजेशीर असेल कारण, माझा यापूर्वी कधीही न पाहिलेला अवतार साकारला मी यामध्ये आहे.”   

कुटुंब, बालिका वधू, कसौटी जिंदगी की, गुप्ता ब्रदर्स आणि अशा अनेक मालिकांमधून रसिकांना भावलेला अभिनेता हितेन तेजवानी म्हणाला की, “मी स्वांग’ची संहिता वाचल्यावर आपण या मालिकेचा भाग होऊ हे पक्के केले. प्रत्येकाला गुन्हेविषयक थरारपट  पाहायला आवडते. एकदा प्रक्षेपण झाल्यावर या शैलीतील एक सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून स्वांग नाव कमावेल याचा मला विश्वास वाटतो. मी यापूर्वी ही शैली केलेली नाही. त्यामुळे त्यात काम करणे अधिक मनोरंजक ठरेल.”

मानसी श्रीवास्तव ही इष्कबाज, दो दिल बंधे एक डोरी से, पीटरसन हिल, ससुराल सिमर का, इश्क में मरजावां 2, यासांरख्या हिट टीव्ही शोची स्टार होती. यावेळी बोलताना ती म्हणाली की, “एक अभिनेत्री म्हणून माझ्या वाट्याला आलेल्या भूमिकांसोबत सतत प्रयोगशील राहणे यासारखे सुख दुसरे नाही. तुम्ही काही संहितांचे वाचन करता आणि ती तुम्हाला आपलीशी वाटू लागते. स्वांग माझ्या हातून निसटणार नाही याची मला खात्री होती. त्याशिवाय कथानक मनोरंजक आहे. अन्य सहकलाकार प्रतिभावान आहेत. त्यांच्या समवेत शूटला नक्की मजा येणार!”

पवित्र रिश्ता, कुमकुम भाग्य आणि ये है मोहब्बतें’सारख्या भूमिकांसाठी अनुराग शर्मा प्रसिद्ध आहे. तो म्हणाला की, “स्वांग’च्या सेटवर प्रत्येक दिवस नवा ठरेल. कारण याचा प्रत्येक प्लॉट आमच्यापैकी प्रत्येकाला पकडून ठेवणारा असल्याने आम्हाला सातत्याने सुधार करणे भाग असेल. ज्यामुळे आम्हाला चांगला बदल घडवून आणण्याची संधी आहे. एक अभिनेता म्हणून कायमच तुम्हाला अशा मालिकांचा भाग होण्याची इच्छा असते. या संधी तुम्हाला कंफर्ट झोनच्या बाहेर आणतात. मला स्वांग’मध्ये संधी मिळाली याचा आनंद वाटतो.” 

प्यार की लुका छुपी’मधील अभिनेता अॅलन कपूर म्हणतो की, “ओटीटी क्रांतिकारी आहे आणि ते जो कंटेंट आणतात, तो अतिशय कल्पक आणि नेहमीपेक्षा निराळा असतो. त्यामुळे, मी जेव्हा कथा ऐकली, तेव्हाच उत्सुकता वाढली. मी या प्रोजेक्टचा भाग असल्याचा मला आनंद वाटतो. आमचे कथासूत्र वळणा-वळणांचे असल्याने प्रेक्षक गुंतून राहील.”

ABUZS ओरीजनलची प्रस्तुती असलेल्या स्वांगचे दिग्दर्शन नितेश सिंग यांनी केले असून हा कार्यक्रम लवकरच हंगामा प्ले आणि अन्य पार्टनर नेटवर्कवर उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading