लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात होळीनिमित्त १०० किलो द्राक्षांची आकर्षक आरास

पुणे :  बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे होळी पौर्णिमेनिमित्त दत्तमंदिरात १०० किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. द्राक्षांचे घड, विविध प्रकारची पाने व फुलांचा वापर करुन ही सजावट साकारण्यात आली होती.

पंढरपूर येथील व्यावसायिक प्रकाश कुलकर्णी यांच्यातर्फे ही आरास करण्यात आली. सुभाष सरपाले यांनी सजावट केली होती. होळी पौर्णिमेनिमित्त साकारलेली आरास सोमवार, दिनांक २९ मार्च पर्यंत असणार आहे. होळीनिमित्त ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर यांच्या हस्ते दत्तयाग होणार आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रुकारी म्हणाले, होळी पौर्णिमेनिमित्त दत्तमहाराजांना हा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. कार्निशन, आॅर्चिड, अ‍ँन्थोरियम, जिप्सो यांसह हिरव्या पानांचा देखील आरास करण्याकरीता वापर करण्यात आला. द्राक्षांचा प्रसाद मंदिरात येणा-या भाविकांना तसेच सामाजिक संस्थांना देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: