Tuesday, June 16, 2026
MAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

सीरम इन्स्टिट्युटकडून Covovax लसीच्या चाचणीला भारतात सुरुवात

पुणे, दि. २७ – भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होतेय. त्यामुळे त्याच गतीने भारतात लसीकरण होणं गरजेचं आहे. याकरता भारतात लसीचा तुडवडा जाणवू नये याकरता लसीची निर्यात बंद करण्यात आली आहे. त्यातच, अमेरिकेतील बायोटेक कंपनी Novavax आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या भागिदारीतून तयार करण्यात येणाऱ्या Covovax या कोरोना लसीच्या चाचणीला भारतात सुरुवात झाली आहे. त्यामुळे लसीकरण करण्यास दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, ही लस कोरोनाच्या ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका व्हेरिेएन्ट विरोधात 89 टक्के कार्यक्षम असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. सप्टेंबर 2021 पर्यंत ही कोरोना प्रतिबंधक लस बाजारात येण्याची शक्यता आहे अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी दिली आहे.

जानेवारी महिन्यात Novavax या लसीची चाचणी ही आफ्रिकेतील 245 कोरोना रुग्णांवर करण्यात आली होती. हे सर्व रुग्ण एचआयव्ही पॉझिटिव्ह होते. त्याना या लसीचा डोस देण्यात आल्यानंतर असं लक्षात आलं की ही लस 48.6 टक्के प्रभावी आहे. त्यानंतर या लसीची ट्रायल ही ब्रिटनमधील 18 ते 84 वयाच्या 15,000 कोरोना रुग्णांवर करण्यात आली. त्यामध्ये 27 टक्के रुग्ण हे 65 वर्षावरील होते. त्यावेळी आलेल्या परिणामातून असं लक्षात आलं की, कोरोनाच्या मूळच्या स्ट्रेन विरोधात ही लस 96.4 टक्के प्रभावी ठरली तर ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनविरोधात ती 86.3 टक्के प्रभावी ठरल्याचं दिसून आलंय. ही लस येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात येणार असल्याचं अदर पुनावाला यांनी सांगितलंय.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading