Wednesday, June 17, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – शनिवारी राज्यात ३५ हजार ७२६ नवे रुग्ण

मुंबई, दि. २७ – राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढ असल्यामुळे राज्य सरकारने कडक पाऊल उचलत उद्यापासून जमावबंदी लागू केली आहे. दरम्यान मागील २४ तासांत राज्यात ३५ हजार ७२६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १६६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १४ हजार ५२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २६ लाख ७३ हजार ४६१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५४ हजार ७३ जणांचा मृत्यू झाला असून २३ लाख १४ हजार ५७९ जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ३ लाख ३ हजार ४७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ९१ लाख ९२ हजार ७५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६ लाख ७३ हजार ४६१ (१३.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४ लाख ८८ हजार ७०१ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर १५ हजार ६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.

राज्यात उद्या (रविवार) रात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार उद्यापासून रात्री ८ वाजल्यापासून ते पहाटे ७ वाजेपर्यंत जमावबंदी लागू होणार आहे. चौपाट्या, उद्याने, मॉल, सिनेमागृह यासाठीही सरकारने अनेक निर्बंध घातले आहे. १५ एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

पुणे शहर कोरोना अपडेट

  • दिवसभरात ३४६३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात २५८४ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ३५ रुग्णांचा मृत्यू. ५ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • ६२१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २५४६८६.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३०८३२.
  • एकूण मृत्यू -५१९१.
    -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २१८६६३.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १७६३३.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading