MeitY च्या वतीने स्नॅपर फ्युचर टेकला भारताचा आश्वासक ब्लॉकचेन स्टार्ट-अप म्हणून मान्यता

सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (एसटीपीआय) ही मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी (MeitY)च्या अंतर्गत येणारी ऑटोनॉमस सोसायटी असून त्यांच्याद्वारे गुरुग्राम येथे नवीन आणि अभिनव स्वरुपाचे सेंटर फॉर एक्सलन्स (सीओई) – ‘एपियरी’ लॉन्च केले. देशात ब्लॉकचेन टेक्नोलॉजीची वाढती मागणी लक्षात घेऊन हा शुभारंभ करण्यात आला. हे इन्क्युबेशन सेंटर भारतातील ब्लॉकचेन टेक्नोलॉजीच्या क्षेत्रातील आश्वासक स्टार्ट-अपच्या भागीदारीत असून स्नॅपर फ्युचर टेक, या वैश्विक सेवा आणि तंत्रज्ञान कंपनीला ब्लॉकचेनचा वापर करून डिजीटल परिवर्तनात अग्रगण्य म्हणून भारतातील 10 आश्वासक ब्लॉकचेन स्टार्ट-अप्सपैकी एक म्हणून मान्यता लाभली आहे.

भारत हा डिजीटल परिवर्तन आणि त्यांच्या राष्ट्रीय ब्लॉकचेन रणनीतीत अग्रभागी असल्याची ही पोचपावती ठरली.  ‘एपियरी’च्या माध्यमातून आपण शिक्षण क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलू शकतो. आमचा क्रेडेन्शियल इश्यूइंग आणि वेरीफिकेशन ब्लॉकचेन मंच सर्व विद्यापीठांत दाखल करण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्नशील आहोत. आमचा विशिष्ट क्षेत्रात कार्यरत असणारा स्टार्ट-अप ब्लॉकचेन संशोधन आणि विकास, तंत्रज्ञान आणि उत्पादन नाविन्य यामध्ये अग्रभागी आहे. आपण एकत्र भारताला जगाच्या नकाशात वैविध्यपूर्ण तंत्रज्ञानाचा आद्यकर्ता म्हणून सादर करू शकतो,” असे उद्गार स्नॅपर फ्युचर टेकच्या भागीदार आणि सीईओ दर्शना जैन यांनी काढले.

सीओई’चा उद्घाटन कार्यक्रम दिनांक 23 मार्च 2021 रोजी व्हर्च्युअली संपन्न झाला, ‘एपियरी’च्या कामाचे सविस्तर स्वरूप हे भारतात ब्लॉकचेन तंत्रज्ञानात काही मातब्बर, अग्रगण्य नावे कार्यरत असताना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाला पुढे घेऊन जाण्याचे आहे. एपियरीचा एक भाग म्हणून स्नॅपर फ्युचर टेकला आता 80 जागांवर सह-कामकाज क्षेत्र आणि समर्पित ब्लॉकचेन मंचापर्यंत प्रवेश असेल. याठिकाणी वास्तविक पायाभूत सुविधांसोबतच सेंटरमध्ये मेंटोरशीप प्रोग्राम आणि व्हीसी फंडींगचीसुद्धा सोय आहे.

सीओई’चे उद्घाटन MeitY चे सचिव अजय प्रकाश साहनी यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी उपस्थित प्रसिद्ध व्यक्तींमध्ये MeitY च्या विशेष सचिव आणि वित्तीय सल्लागार ज्योती अरोरा, MeitY चे संयुक्त सचिव सौरभ गौर, DITECH चे मुख्य सचिव विनीत गर्ग (आयएएस), FITT चे एमडी डॉ. अनिल वली आणि एपियरी सीओईचे चीफ मेंटोर आणि पॅडअप व्हेंचर्सचे संस्थापक पंकज ठाकर यांचा समावेश होता.

MeitY आणि STPI ने ब्लॉकचेन टेक्नोलॉजी क्षेत्रातील आमच्या कार्याची दखल घेतली हा आमचा सन्मान आहे. एपियरी’सारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा भाग असल्याचा आम्हाला आनंद वाटतो”, असे स्नॅपर फ्युचर टेकचे सीओओ आणि सह-संस्थापक नरेश जैन यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: