Tuesday, June 16, 2026
Sports

वरिष्ठ राष्ट्रीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या श्रावणी कटके हिला सुवर्ण

महाराष्ट्र संघाला १ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्यपदके

पुणे : २९ वी वरिष्ठ राष्ट्रीय वुशू अजिंक्यपद स्पर्धा २०२२-२१ चंदीगढ युनिव्हर्सिटी, मोहाली, पंजाब येथे झाली. यामध्ये महाराष्ट्र संघाने १ सुवर्ण पदक, २ रौप्य पदके आणि २ कांस्य पदकांची कामगिरी केली. पुण्याच्या श्रावणी कटके हिने स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. 

स्पर्धेच्या उद्घाटनासाठी पंजाबचे क्रीडामंत्री सुरेंद्रसिंह सोढी उपस्थित होते. पारितोषिक वितरण समारंभासाठी वुशू असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष भूपेंद्र बाजवा, सीईओ सोहेल अहमद, सहसचिव सोपान कटके, द्रोणाचार्य अ‍ॅवॉर्डी कुलदिप सिंह हंडू उपस्थित होते. स्पर्धेत भारतातील राज्य,केंद्रशासित प्रदेश मिळून ४२ संघ उपस्थित होते. ही स्पर्धा सांशू व तावलू या प्रकारात आयोजित करण्यात आली होती.
तावलू कुंफूतायची फॅन मध्ये श्रावणी कटके  हिने (गुणांक ७.००) सुवर्णपदक पटकाविले. स्नेहल बडस्कर (गुणांक ६.९०) आणि मिताली वाणी (गुणांक ६.८०) यांनी रौप्यपदक पटकाविले. तावलू तायचीक्वॅन मध्ये श्रावणी कटके  (गुणांक ७.७०), मिताली वाणी (गुणांक ७.०१) यांनी कांस्यपदक पटकाविले. 
आॅल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे सचिव सोपान कटके, संघ व्यवस्थापक दिपक माळी, संदीप शेलार यांचे स्पर्धकांना मार्गदर्शन मिळाले.    

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading