‘सूर्यदत्ता’ देणार १०० नोकरदारांना ३० लाखांची शिष्यवृत्ती

पुणे : “सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने विविध कंपन्यात नोकरी करणाऱ्या तरुणांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ३० लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित अर्धवेळ अभ्यासक्रमांकरिता या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार असून, सूर्यदत्ता इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट इंटरफेस (सीएसआर) इनिशिएटिव्ह’ अंतर्गत ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे,” अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी संस्थेच्या अधिष्ठाता प्रा. नूतन जाधव, प्रा. शांतीलाल हजेरी आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “ही शिष्यवृत्ती योजना म्हणजे नोकरी करत अर्धवेळ शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी असते. या शिष्यवृत्ती योजनेचे यंदा अकरावे वर्ष असून, गेल्या १० वर्षात १२०० पेक्षा अधिक नोकरदार विद्यार्थ्यांनी अडीच ते तीन कोटी रुपयाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे. २०० पेक्षा अधिक कंपन्यांना आपल्या संस्थेतील चांगल्या कर्मचाऱ्यांची शिफारस करण्याची विनंती करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी उमेदवार पदवीधारक, तसेच २२ ते ५५ या वयोगटातील असणे आवश्यक आहे. विविध कंपन्यांना आपल्या प्रामाणिक आणि गरजू कर्मचाऱ्यांची शिफारस करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी उमेदवार कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे. सर्वच क्षेत्रातील, तसेच पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्यांनाही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल.”

“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांशी संलग्नित पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट (पीजीडीएमएम), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इम्पोर्ट-एक्स्पोर्ट मॅनेजमेंट (पीजीआयईएम), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्सियल सर्व्हिसेस (पीजीडीएफएस), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मटेरियल्स अँड लॉजिटिक्स मॅनेजमेंट (पीजीडीएमएलएम), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेन ट्रेड (पीजीडीएफटी) या एक वर्षाच्या पाच अभ्यासक्रमांना ही शिष्यवृत्ती लागू आहे. प्रोडक्शन मॅनेजर, स्टोअर मॅनेजर, लाईन लीडर, सिनिअर इंजिनिअर, हार्डवेअर-सॉफ्टवेअर इंजिनिअर, टीम मेम्बर, असिस्टंट ब्रांच मॅनेजर, डायरेक्टर, पर्चेस ऑफिसर, स्टोअर असिस्टंट, सुपरिंटेंडेंट्स आदी पदांवर काम करणारे यासाठी पात्र असतील. कर्मचाऱ्यांना वर्गांना उपस्थित राहता यावे, यासाठी सर्व लेक्चर्स विकेंडला कार्यालयीन वेळेनंतर होणार आहेत. सूर्यदत्ता संस्थेत ज्युनिअर क्लार्क, समन्वयक, लायब्ररीयन, रिशेप्शनिस्ट व अन्य कनिष्ठ पदांवर काम करणाऱ्या ७० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून आपले पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. आज अनेक कर्मचारी पीएचडी करत आहेत. अनेकांना बढती मिळाली असून, काहीजण वरिष्ठ, तसेच संचालक पदापर्यंत पोहोचले आहेत. तर काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे, हे या योजनेचे मोठे यश आहे,” असेही डॉ. चोरडिया यांनी नमूद केले.

चोरडिया पुढे म्हणाले, “सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट दर्जेदार, संशोधनात्मक शिक्षण, सर्वांगीण विकास आणि तज्ज्ञ व्यवस्थापन असलेली शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. सोबतच सामाजिक जागरूकता जपत विविध उपक्रम संस्थेत राबवले जातात. विविध कंपन्यांकडून इच्छूक कर्मचाऱ्यांचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. त्यातून योग्य उमेदरवारांची निवड करून त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे पदवीचे शिक्षण झाले की अनेक तरुण नोकरी करण्याच्या मागे लागतात. त्यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही. अशा तरुणांना पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची संधी सूर्यदत्ततर्फे दिली जात आहे. केवळ आर्थिक अडचण असल्याने शिक्षण थांबू नये, हा यामागील उद्देश आहे. कंपन्या पदवीधरांना बढती देत नाहीत. त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन मधील स्पेशालिटी हवी असते. शिवाय, स्वयंरोजगार करत असलेल्या तरुणांनाही आपल्या ज्ञानात भर घालण्याची संधी यामुळे मिळणार आहे. नोकरदार, छोटे व्यावसायिक यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत. जेणेकरून त्यांना करिअरमध्ये प्रगती करता येईल.”

टाटा याझकी, नोव्हार्टीस, आयडीबीआय बँक, झेडएफ स्टिअरिंग, हिंदुस्थान कोकाकोला, सँडविक, भारत फोर्ज, मर्सिडीज बेन्ज, सिप्ला, किर्लोस्कर चिल्लर्स, चौघुले इंडस्ट्रीज, सहज इन्फोटेक आदी कंपन्यांतून कर्मचारी या योजनेचे भाग झालेले आहेत. आपले शिक्षण आणि कौशल्ये त्यांनी विकसित केले आहेत. या शिष्यवृत्ती योजनेला कर्मचारी व व्यवस्थापनाकडून उत्तम प्रतिसाद लाभला असून, संस्थेच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले आहे. या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२१ अशी आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी ०२०-२४३२५८३० किंवा ८९५६९३२४१५ यावर प्रा. नूतन जाधव यांचेशी संपर्क साधावा, असे चोरडिया यांनी नमूद केले.

‘एसआयएमआयआर’ची ठळक वैशिष्ट्ये :
· सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इन्फर्मेशन रिसर्च पुण्याच्या मध्यवर्ती भागात आहे.
· सोयीच्या वेळेत वर्ग भरणार
· आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
· ऑनलाईन असाइन्मेंट्स
· स्पर्धात्मक शिक्षणपद्धती
· लाईफ लॉन्ग लर्निंग
· प्रत्येक विद्यार्थ्यांवर व्यक्तिगत लक्ष
· माजी विद्यार्थ्यांचे मोठे जाळे
· व्यक्तीगत मार्गदर्शन, समुपदेशन
· कामाच्या ठिकाणी कामगिरी उंचावण्यास प्रोत्साहन
· अभ्यागत वर्ग, सेमिनार्स, ग्रंथालय व इंटरनेट सुविधा
· क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
· औद्योगिक भेटीचे आयोजन

Leave a Reply

%d bloggers like this: