PMP – जागतिक महिला दिन साजरा

पुणे, दि. ८ – पीएमपीएमएलचे स्वारगेट मुख्यालयात विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना जागतिक महिला दिनानिमित्त भेटवस्तू व गुलाबपुष्प देण्यात आले. पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप व पीएमपीएमएल चे संचालक शंकर पवार यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. संचालक शंकर पवार यांच्यातर्फे भेटवस्तू देण्यात आली.

पीएमपीएमएलच्या स्वारगेट मुख्यालयाच्या प्रशिक्षण हॉलमध्ये जागतिक महिला दिन साजरा करणेत आला. पीएमपीएमएल चे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश होले, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, स्वच्छता विभाग प्रमुख नितीन वांबुरे यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, परिवहन महामंडळात अनुकंपा तत्वावर भरती झालेल्या महिला व पुरुष बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना लवकरच कायम करणार आहे. तसेच ज्या उमेदवारांनी अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज केला आहे; त्यांनाही लवकरच सेवेत घेणार आहे.
शंकर पवार म्हणाले, पीएमपीएमएल मध्ये विविध पदांवर महिला सक्षमपणे कार्यरत आहेत. कुटुंब व नोकरी या दोन्ही जबाबदाऱ्या महिला ज्या पद्धतीने सांभाळतात; ते खरोखरीच कौतुकास्पद आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: