PMP – 3 वर्षे बंद असलेली बस मार्गावर आणण्यात कोथरूड आगार वर्कशॉपला यश

पुणे, दि. ८ – पीएमपीएमएलचे कोथरूड आगाराकडील बस क्रमांक सीएनजी २५१ ही बस दिनांक ८ जुलै २०१८ पासून इंजिनकाम व स्पेअरपार्ट अभावी बंद होती. सदर बस करीता लागणारे स्पेअरपार्ट व युनिट असेंब्ली उपलब्ध करून सदर बसचे काम करून दि. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी आरटीओ पासिंगचे कामकाज पूर्ण करून बस मार्गावर संचलनात आणण्यात आली आहे.

पीएमपीएमएलचे मुख्य अभियंता कैलास गावडे यांनी सदर बस करीता लागणारे स्पेअरपार्ट व युनिट असेंब्ली उपलब्ध करून दिली.
पीएमपीएमएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप व पीएमपीएमएल चे संचालक शंकर पवार, नगरसेविका अल्पना वरपे यांच्या हस्ते सदर बसला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. यावेळी पीएमपीएमएल चे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोथरूडआगार व्यवस्थापक चंद्रशेखर कदम व आगार अभियंता विलास मते यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड आगार वर्कशॉपमधील एकूण ९ सेवकांनी सदर बस मार्गावर संचलनात आणणेसाठी परिश्रम घेतले. या सेवकांमध्ये राजेंद्र पायगुडे (हेल्पर वर्ग १ क्र.४८), राजू गाडे (असिस्टंट इलेक्ट्रिशिअन), महेंद्र लादे(असिस्टंट बॉडी फिटर), सुनिल मारणे, नवनाथ राठोड, भरत बहिरम, इहजिन मोहिरे, सागर जाधव, अतुल सायकर (क्लिनर) यांचा समावेश आहे.
कोथरूड आगारातील २०१८ पासून बंद असलेल्या ७ बसेस आवश्यक ती दुरुस्तीची कामे करून डिसेंबर २०२० पासून आत्तापर्यंत मार्गावर आणण्यात यश आल्याचे कोथरूड आगार व्यवस्थापक चंद्रशेखर कदम यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: