महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमध्ये
विविध उपक्रमांनी महिला दिन उत्साहात साजरा

पुणे, दि. ८ – महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमध्ये वक्तृत्व स्पर्धा ,वेबिनार ,स्व संरक्षण प्रात्यक्षिके , माजी विद्यार्थिनींचे अनुभव कथन , आर्किटेक्ट महिलांशी संवाद अशा विविध उपक्रमांनी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने महिला दिनी 'स्पिक अप गर्ल्स ' ही ऑन लाईन वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी आणि माजी विद्यार्थी मंडळातर्फे तर्फे महिला दिनी 'स्पिक अप गर्ल्स 'ही ऑन लाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . मराठी ,हिंदी ,इंग्रजी भाषेत ही स्पर्धा झाली, अशी माहिती प्राचार्य डॉ किरण भिसे ,समन्वयक रजत सय्यद यांनी दिली.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ए.के.के. न्यू लॉ अॅकॅडमी च्या वतीने महिला दिनानिमित्त ‘महिला आणि मानवाधिकार ‘विषयावर नॅशनल वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. ८ मार्च रोजी सकाळी १० वाजता हा वेबिनार झाला. डॉ.के.व्ही. सर्मा, डॉ. दुर्गंाबिनी पटेल, डॉ. अंजली कुरणे, आबेदा इनामदार सहभागी झाल्या होत्या.डॉ. रशीद शेख, डॉ.सलीम शेख, डॉ. प्रीतम जैन डॉ. स्वाती शिंगटे, डॉ.मनीषा मित्तल, डॉ. समिना मीर, सुमेर शेख यांनी संयोजन केले .

आझम स्पोर्टस् अकॅडमी च्या वतीने महिला दिनानिमित्त स्व संरक्षण प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते . ८ मार्च रोजी सकाळी ८ ते ८.४५ या वेळात ही प्रात्यक्षिके ऑनलाईन सादर करण्यात आली . आझम स्पोर्ट्स अकादमी चे संचालक गुलझार शेख यांनी ही माहिती दिली .

आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज मध्ये महिला दिन कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचे अनुभव कथन आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पुणे विभागाच्या सहायक शिक्षण संचालक मीना शेंडकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.अध्यक्ष स्थानी आबेदा इनामदार या होत्या .

प्राचार्य शाहीन शेख,उप प्राचार्य गफार सय्यद यांनी ही माहिती दिली. ८ मार्च रोजी गुगल मीट द्वारे कार्यक्रम सकाळी साडे अकरा वाजता हा अनुभव कथनाचा कार्यक्रम पार पडला. डॉ अझमत दलाल,सबिहा शेख ,रुखसार माईणकर ,शेरवानी नागरे ,स्वलेहा इनामदार ,सारिया अन्सारी ,इरम काची ,बुशरा शेख ,प्रियाशा मोहिते यांनी आपलेअनुभव कथन केले.

आझम कॉलेज ऑफ एज्युकेशन तर्फे महिला दिनानिमित्त ‘ प्रचलित आणि दूर शिक्षणातून महिला सक्षमीकरण ‘ या विषयावर नॅशनल वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात इंदीरा गांधी मुक्त विद्यापीठ( दिल्ली )चे प्राध्यापक सी. बी. शर्मा तसेच डॉ. शाहीन शेख सहभागी झाले होते. हा कार्यक्रम ८ मार्च रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन झाला. डॉ. अनिता बेलापूरकर, प्राध्यापक निलोफर पटेल इत्यादी सहभागी झाले .

अल्लाना कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर तर्फे महिला दिनानिमित्त ‘ काम आणि दैनंदिन आयुष्यातील आव्हाने ‘ या विषयावर तीन आर्किटेक्ट महिलांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हा ऑनलाईन संवाद ८ मार्च रोजी दुपारी १२ .४० वाजता झाला. यामध्ये मृणालिनी साने, डॉ.अंशुल गुजराथी, शामी डेरेन आर्किटेक्ट महिलां सहभागी झाल्या होत्या. प्राचार्य लीना देबनाथ यांनी ही माहिती दिली.

अँग्लो उर्दू बॉइज हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज मध्ये आज दि. ८ मार्च २०२१ रोजी सकाळी ११ वा. जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेच्या उपाध्यक्षा आबेदा ईनामदार व प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत आकाशात फुगे सोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या फुग्यांवर आम्ही सावित्रीच्या लेकी आणि प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांची गुजर जायेगा… वक्त ही तो है ही कविता कोरण्यात आली होती. तंजिमा शेख मुख्याध्यापिका परवीन झेड. शेख डॉ. साधना लच्छानी , सिस्टर सारा इंगळे , सिस्टर मनीषा, पोलिस कर्मचारी रहिशा शेख ,वर्षा धुमाळ, प्रियांका खेडेकर उपस्थित होत्या. शेख अताउल्ला, नितीन तोडकर व मुहम्मद अली मुंशी सना शेख रोशन आरा शेख यांनी संयोजन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: