कर्तव्य फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्या महिला लीलाबाई गायकवाड यांचा सन्मान

पुणे, दि. ८ – जागतिक महिला दिनानिमित्त कर्तव्य फाउंडेशन तर्फे पुणे कॅम्प भागातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,अरोरा टाॅवर येथील वृत्तपत्र विक्रेत्या जेष्ठ महिला लीलाबाई गायकवाड यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळेस फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे ,कार्याध्यक्ष अशोक देशमुख, सुनील बाथम,ज्ञानेश्वर गोडसे, संग्राम चव्हाण आदी उपस्थित होते.

लीलाबाई गायकवाड यांचे वय ८० वर्षे असून त्या गेली २८ वर्षांपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील अरोरा टाॅवर जवळ वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्या कॅम्पातील धोबीघाट येथे राहण्यास असून त्या अत्यंत मेहनती व प्रामाणिक आहेत.मराठी,हिंदी व इंग्रजी वृत्तपत्र व मासिके त्या विकतात.त्यांच्या कार्याचा विकास भांबुरे यांनी गौरव केला व त्यांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: