‘आर्ट फॉर फ्रीडम’चे सामाजिक परिवर्तनासाठी राष्ट्रीय ‘चॅलेंज’मध्ये जनसहभागाचे आवाहन
पुणे – युवक आणि सर्वसामान्य नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादातून प्रेरणा घेत #डीएनएफाइटसरेप-सेव्ह द एव्हिडन्स (#DNAFightsRape–Save the Evidence) या प्रसार मोहिमेने राष्ट्रीय स्तरावरील सर्जनशील चॅलेंज ‘आर्ट फॉर फ्रीडम’ दाखल केले आहे. बलात्कार आणि लैंगीक अत्याचारातील पीडीतांकडे समाजाची पाहण्याची जी वृत्ती आहे ती बदलण्याच्या दृष्टीने ही मोहीम दाखल केली गेली आहे. त्याद्वारे या घटनांमधील जबाबदारी ही पिडीतेपेक्षा गुन्हेगारावर नक्की केली जाईल, असे उद्दिष्ट त्यामागे आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या लैगिक समानता आणि महिला सबलीकरणासाठी काम करणाऱ्या युएन विमेन इंडिया अँड गर्ल अप (संयुक्त राष्ट्रासंघाशी सलग्न संस्था) या संघटनेने या मोहिमेला सहकार्य केले असून त्यांना नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी, दिल्ली (एनआयएफटी) आणि सिम्बॉयसीस इन्स्टीट्युट ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट, पुणे (एसआयएमबी), यांचे पाठबळ आहे. या मोहिमेच्या माध्यमातून समाजावरील कलेचा असलेला प्रभाव आणि सर्जनशिलतेला बळकटी देणे आणि त्याद्वारे समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, हा उद्देश आहे.
‘आर्ट फॉर फ्रीडम’मध्ये सर्व स्तरातील नागरिकांनी आणि खास करून विद्यार्थी, कलाकार, डिझायनर आणि सर्जनशील व्यावसायिक लोकांनी पुढे येत सहभागी व्हावे आणि ते जेव्हा जेव्हा भयानक अशा बलात्काराबद्दल ऐकतात तेव्हा त्यांना जो राग, वैफल्य, निराशा येते आणि इतर भावना त्यांच्या समोर येतात त्या व्यक्त कराव्यात, असे आवाहन केले गेले आहे. कलेच्या शक्तीच्या माध्यमातून सध्याची शैथिल्य कमी करावे आणि महिला, मुले आणि स्त्री-पुरुषांमध्ये जी सातत्यपूर्ण भीती लागून राहिलेली असते ती कमी करावी, अशी भावना त्यामागे आहे. जेव्हा प्रतिगामी मानसिकता बदलते, आणि बलात्कारातील पीडीतेवरून लक्ष हे गुन्हेगाराकडे जाते तेव्हाच आपण लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करू शकतो. ‘डीएनए’सारखे तंत्रज्ञान आणि फॉरेन्सिक सायन्ससारख्या आधुनिक शास्त्रांच्या माध्यमातून गुन्हेगाराला शिक्षा देणारी यंत्रणा उभी करत हा आत्मविश्वास जागवायचा आहे.
‘युएन विमेन इंडिया’च्या राष्ट्रीय उपप्रतिनिधी निष्ठा सत्यम म्हणाल्या, “लैंगिक विषमता जोपासणारे सामाजिक-सांस्कृतिक आणि स्वभावात्मक मापदंड बदलणे अनिवार्य असून महिलांवर होणारे अत्याचार कमी करणेही गरजेचे आहे. संस्कृतीला आकार देणे आणि प्रतिमाबदल घडवणे यासाठी कला महत्वपूर्ण कामगिरी बजावते. म्हणूनच आम्ही तुम्हाला ‘आर्ट फॉर फ्रीडम’ मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत आहोत. त्याद्वारे सामुहिक आवाज अधिक बळकट होईल आणि महिला, मुली आणि इतर लिंगाच्या लोकांवरील अत्याचार कमी होण्यासाठी कलेच्या माध्यमाची मदत होवू शकेल.”
एनआयएफटी दिल्लीच्या सह-प्राध्यापक नीती बांगा म्हणाल्या, “निर्णायक चिंतनप्रक्रिया आणि सर्जनशील अभिव्यक्ती ही आजही फारशी वापरली जात नाही. जगाला आज समावेशक दृष्टीकोन असलेल्या चांगल्या लोकांची गरज आहे. त्यासाठी एक आवाज होण्याची गरज आहे! कला, नाटक, संगीत, नृत्य यांच्या माध्यमातून गंभीर अशा सामाजिक प्रश्नांवर चिंता व्यक्त करा आणि त्या माध्यमातून मानवतेला स्पर्श करा. हे रुपांतर नवीन सहानुभूतीपूर्ण अभिव्यक्ती व सेवा यांच्या एकत्रीकरणाला वाव देतील. ते आजच्या युवकाच्या माध्यमातून होणे शक्य आहे. या कामामध्ये हातभार लावत असल्याचा आम्हाला आनंद असून त्या माध्यमातून हा संदेश घराघरात पोहोचेल असा आमचा प्रयत्न आहे.”
या चॅलेंजच्या माध्यमातून सर्जनशीलता आणि मूळ कलाकृतींना हातभार लागतो. त्याद्वारे कलाकार त्यांना हव्या असलेल्या प्रकारामध्ये आपली कला सादर करू शकतात. चित्र, रेखाटन, शिल्प, वस्त्र, कविता, संगीत ध्वनिमुद्रण आणि भित्तीचित्र यांचा त्यामध्ये समावेश असेल. मात्र हे सर्व डिजिटली सादर करायचे आहे.
या प्रवेशिका कलाकार आणि कलाकारेतर अशा विभागांमध्ये परीक्षणाखालून जातील. त्यानंतर झालेल्या नामांकनाची घोषणा १५ एप्रिल रोजी जागतिक कला दिनी केली जाईल. त्यानंतर सर्वोत्तम कलाकृती ही व्हर्च्युअल आर्ट शोकेसमध्ये प्रदर्शित केली जाईल. विजेत्याची निवड अंतिम परीक्षक मंडळाने केलेल्या निवडीवर होईल. या मंडळामध्ये कला, डिझाइन, सार्वजनिक धोरणे, विधी आणि सामाजिक न्याय क्षेत्रातील तसेच शिक्षणतद्न्य अशा ख्यातनाम लोकांचा समावेश असेल.
या उपक्रमाबद्दल गौरोवोद्गार काढताना गॉर्डन थॉमस हनीवेल-जीएचे संस्थापक आणि अध्यक्ष टीम शेलबर्ग म्हणाले, “युवक आणि कलाकार हे नेहमीच जगभरातील सामाजिक चळवळींमध्ये आघाडीवर राहिले आहेत. त्यांची सर्जनशीलता आणि ऊर्जा यांच्या माध्यामतून बदल अधिक गतिमान झालेले पाहायला मिळाले आहेत. इतर अनेक देशांप्रमाणे भारतसुद्धा बलात्कारांच्या समस्येशी लढत आहे. सरकारी संस्था आधुनिक डीएनएसारख्या फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा आवाका वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याद्वारे लैंगिक गुन्हे कमी करणे आणि त्यांना रोखण्यासाठी एक धाक निर्माण करणे, या गोष्टी साध्य करणे अपेक्षित आहे. या क्षेत्रात खूप काही करणे गरजेचे असताना पिडीतेला दोष न देता गुन्हेगाराला हातकड्या घालण्यापर्यंतचा सांस्कृतिक बदल झाला तर तो अधिक परिणामकारक असेल. त्यासाठी गुन्हेगार गुन्ह्याच्या ठिकाणी जो ‘डीएनए’ पुरावा मागे सोडतो तो अत्यंत महत्वाचा असतो आणि त्याचा प्रभावी उपयोग केला जावू शकतो.”
ऑगील्व्ही इंडियाच्या जनसंपर्क आणि जनप्रभाव विभागाच्या प्रमुख अर्निता वासुदेव म्हणाल्या, कला ही लोकांना बदलते आणि लोक जग बदलतात या विचारांवर ठाम विश्वास ठेवत आम्ही ‘आर्ट फॉर फ्रीडम’ हे चॅलेंज सुरु करत आहोत. त्या माध्यमातून आम्ही आमच्या सहकाऱ्यांबरोबर ही मोहीम दाखल करत असून त्या माध्यमातून आपला समाज बलात्कार पिडीतेकडे ज्या दृष्टीकोनातून पाहतो त्यामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणायचा आहे. ज्या महिलेवर बलात्कार झाला आहे तिच्यात दोष शोधण्याची आपली मनोवृत्ती असते. तिचे काय चुकले आणि हा दुर्दैवी प्रकार टाळण्यासाठी ती काय करू शकली असती, यावर अधिक चर्चा होते. आपण गुन्हेगारावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे आणि त्यासाठी डीएनए पुरावे सांभाळून ठेवत गुन्हेगाराला सजा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.”
नोंदणी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://forms.gle/ES4zdyxE661KhtXQA
