fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

PMP अटल बससेवा योजनेअंतर्गत सनसिटी ते कोथरूड स्टँड बससेवा सुरू

पुणे, दि. १ – पीएमपीएमएल कडून फक्त ५ रुपयांत ५ किमी पर्यंत प्रवासी सेवा देणाऱ्या अटल बससेवा योजनेअंतर्गत मार्ग क्र. के-२२ सनसिटी ते कोथरूड स्टँड या नवीन बसमार्गाचे उदघाटन पीएमपीएमएलचे संचालक शंकर पवार, नगरसेविका मंजुषा दिपक नागपुरे, नगरसेवक प्रसन्न जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


यावेळी पीएमपीएमएल चे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, प्रशासन अधिकारी नितीन घोगरे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, कोथरूड आगार व्यवस्थापक चंद्रशेखर कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्ग क्र. के-२२ या मार्गावरील बस सनसिटी- कृष्ण मंदिर- स्टार गार्डन- शिवपुष्पक पार्क- आनंदनगर- हिंगणे- विठ्ठलवाडी- राजाराम पूल- श्रीमान सोसायटी- शिप्रा सोसायटी- कॅनॉल कॉर्नर- कर्वेनगर- वडाचा स्टॉप- गांधी भवन फाटा- कोथरूड स्टँड या मार्गाने जाईल. प्रवाशांच्या सेवेत सध्या हि बससेवा दर १ तासाला असेल.
यावेळी सनसिटी परिसरातील नागरिकांनी सनसिटी येथून शिवाजीनगर, कात्रज व हिंजवडी हे बस मार्ग सुरू व्हावेत अशी मागणी केली. यावर कोरोना संपुष्टात आल्यानंतर मागणी असलेले मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न करू असे शंकर पवार यांनी सांगितले. तसेच अटल बससेवेअंतर्गत फक्त ५ रुपये तिकीट दरात सुरू झालेल्या नवीन बस मार्गाला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
दत्तात्रय झेंडे यांनी त्यांच्या मनोगतामध्ये अटल बससेवा अंतर्गत सुरू केलेल्या सनसिटी ते कोथरूड स्टँड या मार्गावर फक्त ५ रुपयात प्रवाशी सेवा उपलब्ध असल्याने नागरिकांची प्रवास खर्चात मोठी बचत होणार आहे; तसेच पीएमपीच्या माध्यमातून उत्तम प्रकारची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते दिपक नागपुरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading