गुगलच्या सहकार्यातून महिला अभियंतासाठी ‘टॅलेंटस्प्रिंट डब्ल्यूइ’च्या तिसऱ्या पर्वाची घोषणा १ मार्च पासून अर्जाची सुरुवात

पुणे, दि. १ मार्च – आघाडीचे एड-टेक व्यासपीठ आणि एनएसई समूहाची कंपनी असलेल्या ‘टॅलेंटस्प्रिंट’ने गुगलच्या सहाय्याने आज आपल्या अग्रणी अशा विमेन इंजीनीयर्स प्रोग्राम(डब्ल्यूइ)च्या तिसऱ्या पर्वाची घोषणा केली आहे. ‘टॅलेंटस्प्रिंट डब्ल्यूइ’ची सुरुवात २०१९ मध्ये तंत्रज्ञान उद्योगामध्ये जी लैंगिक विषमता दिसून येते त्यावर प्रकाश टाकण्यासाठी सुरु केली. आधीच्या पर्वांमध्ये या मोहिमेला या क्षेत्राकडून जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, त्या पार्श्वभूमीवर तिसरे पर्व हे अधिक मोठ्या प्रमाणावर साजरे होत असून त्यात तब्बल ५००जण सहभागी होत आहेत. हे पर्व  भारतभरातील  पहिल्या वर्षाला असलेल्या महिला अभियांत्रिकी विद्यार्थीनींना सामावून घेणाच्या दृष्टीने आखले गेले आहे आहे.  युवा महिला अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ‘टॅलेंटस्प्रिंट डब्ल्यूइ’उपक्रमाबद्दल we.talentsprint.com  वरून अधिक माहिती मिळविण्यास प्रोत्साहित केले जाते. उपक्रमासाठीचे अर्ज १ मार्च २०२१ रोजी सुरू होत असून २१ मार्च २०२१ रोजी बंद होतील.

 आज जागतिक तंत्रज्ञान मानवी संसाधनक्षेत्रामध्ये केवळ २६ टक्के महिला आहेत. ‘टॅलेंटस्प्रिंट डब्ल्यूइ’ या उपक्रमाच्या माध्यमातून या लैंगिक विषमतेवर प्रकाशझोत टाकण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थिनींना निवडत, त्यांचे प्रशिक्षण आणि संवर्धन करत हे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे. त्यासाठी वैविध्यपूर्ण शैक्षणिक आणि सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीच्या मुलींची निवड केली जाणार आहे. त्याद्वारे सॉफ्टवेअर अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांची क्षमता पूर्ण केली जाणार आहे.   आजपर्यंत गुगल, अमेझॉन, फ्लीपकार्ट, मायक्रोसोफ्ट, गोल्डमन सचस, असेंचर, ऍडोब, कॅपजेमिनी, ओरॅकल, गोजेक, मॅथवर्क्स आणि इतर आघाडीच्या अशा ५० कंपन्यांनी या स्पर्धकांना एकतर प्रशिक्षणार्थी म्हणून संधी दिली आहे .   तिसऱ्या पर्वासाठी अत्यंत कठोर अशा बहुटप्पे निवड प्रक्रियेतून स्पर्धकांना निवडले जाणार असून ज्या विद्यार्थ्यांना या पर्वासाठी बोलावले जाणार आहे त्यांना पूर्ण किंवा अंशतः आर्थिक मदत दिली जाणार आहे. हे मानधन त्यांच्या प्रतिभेवर आणि आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असेल

‘टॅलेंटस्प्रिंट’चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संतनू पॉल म्हणाले  “आमच्या सुरुवातीपासूनच ‘टॅलेंटस्प्रिंट’ने अनेक पथदर्शी विक्रम केले आहेत आणि त्या माध्यामतून उच्च तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये लैंगिक विषमता दूर होईल, यासाठी प्रयत्न केले आहेत या उपक्रमाला  शैक्षणिक क्षेत्राकडून आणि युवा महिला विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतीसम मिळाला. या उपक्रमाचे स्वरूप आणि विद्यार्थ्यांकडून मिळणारा अद्वितीय प्रतिसाद या दोन्ही बाबतीत हा उपक्रम आगळा ठरला. हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे आणि अजूनही कितीतरी चांगले काम केले जावू शकते आणि त्या माध्यामतून लैंगिक विषमता दूर केली जावू शकते. त्यासाठीच आम्ही गुगलबरोबरचे आमचे सहकार्य अधिक दृढ केले असून त्याद्वारे युवा महिलांसाठी अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यंदाच्या पर्वत जागतिक स्तरावरील महिला सोफ्टवेअर अभियंते त्यातून पुढे यावेत हे उद्दिष्ट आहे.

गुगल मधील सर्च-ऍड विभागाचे उपाध्यक्ष शिव वेंकटरमण म्हणाले  “सर्वाना खऱ्या अर्थाने समान संधी देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर उपयोगी पडेल अशी सेवा उपलब्ध करण्यासाठी तंत्रज्ञान संस्थांमधील महिलांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. मागील पर्वामध्ये जे यश आम्हाला मिळाले त्यांनी आम्हाला स्फूर्ती मिळाली असून त्यातून आम्ही या मोहिमेचे स्वरूप अधिक भव्य केले आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: