हर घर कि खिडकी : टाटा स्काय अंतर्गत नवी मोहिम
पुणे – भारतातील आघाडीच्या अव्वल क्रमांकांच्या डीटीएच आणि पे टीव्ही व्यासपीठ टाटा स्काय ने भारतीयांसाठी कंटेंटचा अनुभव अधिक सहजसोपे करण्यासाठी आपली बांधिलकी दृढ करत आपला नवा ब्रँड पर्पझ म्हणजेच उद्देश ‘टाटा स्काय कुटुंब आणि घरांचा भविष्यकाळ आजहून अधिक चांगला करण्यासाठी प्रयत्नशील आहे’ या विचारातून मांडला आहे. टाटा स्काय आता देशभरातील २२ दशलक्षांहून अधिक घरांमध्ये पाहिला जातो. टाटा स्कायची नवी जाहिरात हिंदी, मराठी, तेलुगु, तामिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि उडिया या भाषांमध्ये विविध मीडिया माध्यमांमध्ये दाखवली जाणार आहे. ही जाहिरात आपल्याला टीव्हीच्या जगातून विविध कुटुंबं आणि व्यक्तींच्या आयुष्यात डोकावण्याची संधी देते.
या लोकांच्या आयुष्यातील एकत्र असण्याचे, शिकण्याचे, आनंदाचे क्षण आपल्याला दिसणार आहेत.सोशल मीडियावर # हर घर कि खिडकी मोहिमेतून लोकांना यात सहभागी करून घेतले जाणार आहे. टाटा स्कायच्या लेन्समधून दिसलेल्या आपल्या प्रेक्षकांच्या आयुष्यातील काही निवडक क्षण जसेच्या तसे आपण पाहणार आहोत. या मोहिमेत लोकप्रिय इन्फ्लुएन्सर्स आपल्या फॉलोअर्सना आणि इतर कंटेंट क्रीएटर्सना त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे, टाटा स्काय पाहताना कुटुंब एकत्र आनंद घेत असल्याचे क्षण टिपून त्यासह सहभागी होण्याचे आवाहन करणार आहेत. ब्रँडची ओळख म्हणून यात या जाहिरातीचा ओरिजनल ऑडिओ वापरायचा आहे. ब्रँडच्या या नव्या उद्देशाला अनुसरून टाटा स्कायने ‘या खिडकीला उघडलं तर लाईफ जिंगालाला’ या नव्या ओळीसह मोहीम सादर केली आहे. यात खिडकीम्हणजे टाटा स्कायच्या माध्यमातून उपलब्ध झालेला मनोरंजनाचा नवा मार्ग आहे ज्यात लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील भावनिक आनंदाचे अधिक क्षण उपलब्ध होतील.
टाटा स्कायचे एमडी आणि सीईओ हरित नागपाल म्हणाले “काही मूळ तत्वांनी टाटा स्कायला नेहमीच मार्गदर्शन केलं आहे, आमच्या ब्रँडचा उद्देश स्पष्ट केल्याने लोकांच्या आयुष्यात आम्ही सातत्याने मूल्यवर्धन करत असल्याचे आमचे प्रयत्न अधोरेखित होतात “कुटुंब आणि घरासाठी त्यांचा भविष्यकाळ आजहून अधिक चांगला करण्यासाठी टाटा स्काय आहे, या विचारातून ब्रँडचा भावनिक ताकदीवर असलेला विश्वास अधिक दृढ झाला आहे.