एशियन कॉलेजमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन

पुणे, दि. 22 – ए.ए.ई.आर. संस्थेचे एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, धायरी, पुणे व शिवगर्जना मर्दानी अखाडा संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एशियन कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त महाविद्यालयात शिवकालीन दुर्मिळ शस्त्रास्त्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांना व समाजातील प्रत्येक घटकाला, नागरिकांना ऐतिहासिक बाबींची, शिवकालीन शस्त्रास्त्रांची माहिती व्हावी व हा ऐतिहासिक वारसा असाच जपून ठेवावा या हेतूने हे प्रदर्शन भरविले गेले.

प्रदर्शनात भाले, तलवारी, कट्यार, खंजीर, बिचवा, वाघनखे, इत्यादी शस्त्रास्त्रांचे विविध प्रकार तसेच चिलखत, अंगरखा, तोफ हे सर्वच एकाच ठिकाणी पाहायला मिळाले.
शस्त्रास्त्रांविषयीच्या अभ्यासामुळे प्रदर्शनात शस्त्रास्त्रे बघण्याबरोबर त्यांची रोचक माहिती जाणून घेण्याचा आनंद विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही मिळाला. धायरी, नऱ्हे, वडगाव, वारजे, सिंहगड परिसर, आर्वी, रांझे, खानापूर, खडकवासला, इत्यादी विविध भागांतील नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.

या प्रदर्शनाचे उद्घाटन ए.ए.ई.आर.संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अनिता साप्ते व खडकवासला मतदार संघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वाती पोकळे (शहराध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस ), सचिन पोकळे, सुरेखा दमिष्टे, संजयराव पासलकर आदी उपस्थित होते. तसेच दिवसभरात हरिश्चंद्र दांगट पाटील, पूजा रावतेकर (तालुका प्रमुख, महिला आघाडी, शिवसेना), नितीन जांभळे पाटील (अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र कामगार आघाडी भा.ज.पा.), मिलनसिंह परदेशी, बाणदार साहेब (ग्रामसेवक, आर्वी), चेतन संपतराव जाधव (सरपंच, आर्वी), युवराज दिसले (अध्यक्ष, पुणे शहर, युवक मराठा महासंघ), आदींनी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शविली


ए.ए.ई.आर.संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अनिता साप्ते ए.ए.ई.आर.संस्थेचे सचिव अनिल साप्ते, उपाध्यक्ष अनिल साप्ते, संचालक माधव दंडवते, प्राचार्य डॉ. शिवाजीराव काकडे, उपप्राचार्य प्रा. घनःश्याम देवरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सोमनाथ स्वामी व मा. हेमंत वसंत तिरळे (अध्यक्ष, शिवगर्जना मर्दानी अखाडा, संस्था, पुणे), मा. महेशराव पारशिवनीकर (उपाध्यक्ष, शिवगर्जना) यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Leave a Reply

%d bloggers like this: