स्वातंत्रासाठी डोक्यात ब्रिटीशांची लाठी खाणारे मौलाना आझाद हे पहिले स्वातंत्र्य सेनानी- गोपाळदादा तिवारी

पुणे दि २२ – काँग्रेस भवन येथे पुणे शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे वतीने थोर स्वातंत्र्य सेनानी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे मा. अध्यक्ष व देशाचे प्रथम शिक्षण मंत्री मौलाना अबूल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमात मौलाना आझाद यांच्या प्रतिमेस प्रदेश काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आपल्या भाषणात गोपाळदादा तिवारी म्हणाले, महात्मा गांधीं यांनी ‘पहिला मीठाचा सत्याग्रह’ केला तेव्हा जेवढे सत्याग्रही जमले होते, त्यापेक्षा दुप्पट ब्रिटिश बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर लाठ्या, बंदुका घेवुन उभा होता ‘जो पहिल्यांदा मीठ उचलेल’ त्याच्यावर पहिली लाठी ब्रिटिशांची पडणार हे निश्चित माहिती असूनही अनेक स्वातंत्र्य सेनानी बापू तथा महात्मा गांधी यांनी आपल्याला पहिल्यांदा मीठ उचलण्यास परवानगी द्यावी, याकरता चुरस होती. बापूंनी मौलाना अबुल कलाम आझाद यांना प्रथम मीठ उचलण्यास मान्यता दिली व त्यानंतर सर्व स्वातंत्र्य सेनानी यांनी मीठ उचलून इग्रंजाच्या विरोधात ‘कायदेभंग चळवळीची’ सुरुवात केली व मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पाठोपाठ प्रत्येक मीठ उचलणाऱ्या सत्याग्रहींवर इंग्रजांची लाठी पडत होती.. अशा थोर स्वातंत्र्य सेनानीना व अ. भा. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष असलेल्या स्व श्री मौलाना अबुल कलाम आझाद यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली..

या कार्यक्रमात अल्पसंख्याक शहर विभागाचे उपाध्यक्ष निसारखान यांचेही भाषण झाले यावेळी पुणे शहर काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष यासीन शेख, सचिन आडेकर, ॲड फैयाज शेख, मा निसार खान, संदिप मोरे, राजेंद्र पेशने, सलिम मुल्ला, रियाज शेख, आसीफ शेख, साजिद शेख,महमूद शेख, सज्जो शेख, मुजफर शेख, सेल्वराज अँथनी, मोनिका पठारे, अकबर मेमन इ उपस्थित होते..

Leave a Reply

%d bloggers like this: