आनंद भाटे यांच्या गायनाने वसंतोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप

पुणे, दि. २० – किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांच्या सुरेल गायनाने १४ व्या वसंतोत्सवाच्या दुस-या दिवसाची सांगता झाली. त्यांनी राग मारुबिहागने आपल्या गायनाला सुरूवात केली. विलंबित एकतालातील बडा खयालमधील ‘रसिया हो ना जाओ…’ तर द्रुत तिनतालमधील ‘परि मोरी नाव मजधार…’ या बहारदार रचना त्यांनी पेश केल्या.

डाॅ. वसंतराव देशपांडे यांचा ठुमरी गायनात हातखंडा होता अशी आठवण सांगत आनंद भाटे यांनी उस्ताद सलामत अली खाँ साहेबांची पंजाबी ढंगाची ‘मोरे नैना लगरी बरसात…’ही ठुमरी सादर केली. ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली…’ या भारतरत्न पं भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या अभंगाने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला.

त्यांना डाॅ. आदित्य ओक यांनी संवादिनी, निखील फाटक यांनी तबला तर जिग्नेश वझे,  नारायण खिलारी यांनी तानपु-यावर साथ केली.

Leave a Reply

%d bloggers like this: