PMP कात्रज आगार व श्रीमंत सेवा प्रतिष्ठानने रक्तदान शिबिरातून जपली सामाजिक बांधिलकी

पुणे, दि. १८ – पीएमपीएमएलचे कात्रज आगार व श्रीमंत सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज यांच्या सहकार्याने शिवजयंती व राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या सांगता समारंभाचे औचित्य साधून देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या शूर सैनिकांसाठी कात्रज आगारात भव्य व नाविन्यपूर्ण रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिरात २१२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने श्रीमंत सेवा प्रतिष्ठान, नितीन दळवी व रामेश्वर मोरे यांच्या तर्फे हेल्मेट व पाण्याची बाटली भेट म्हणून देण्यात आली. तसेच आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज यांच्या तर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले.
पीएमपीएमएल ने कोरोनाच्या काळात अव्याहतपणे सेवा पुरवून व आता भारतमातेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी रक्तदान शिबिर राबवून सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

पीएमपीएमएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त माधव जगताप, नगरसेविका स्मिता कोंढरे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. या रक्तदान शिबिरास पीएमपीएमएल चे संचालक शंकर पवार, नगरसेविका अमृताताई बाबर, ‘रक्ताचे नाते’ ट्रस्टचे राम बांगड, पीएमपीएमएल चे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय शिंगाडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, प्रशासन अधिकारी नितीन घोगरे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, वंदे मातरम संघटनेचे प्रशांत नरवडे आदी मान्यवरांनी भेट देऊन या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी उल्लेखनीय कामगिरी केलेले कात्रज आगाराचे सेवक दिलीप तोडकर (वाहक), महेंद्रनाथ पिंगळे (चालक), राहुल शेळके (क्लिनर), नरेंद्र कबुले (वाहक) यांचा मुलगा ओंकार यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या भव्य रक्तदान शिबीरासाठी आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिकारी व त्यांची टीम, कात्रज आगार व्यवस्थापक विजय रांजणे, श्रीमंत सेवा प्रतिष्ठानचे भरत गिरे व प्रतिष्ठानचे सर्व सभासद तसेच कात्रज आगारातील सेवकांनी विशेष परिश्रम घेतले. सुभाष मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. निलेश जगताप यांनी आभार मानले.

डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “हे रक्तदान शिबीर म्हणजे खऱ्या अर्थाने आगळावेगळा, नाविन्यपूर्ण व उपयुक्त असा उपक्रम आहे. पीएमपीएमएल कडून सातत्याने असे उपक्रम राबविण्यात यावेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने खबरदारी घेणे गरजेचे आहे.”

दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल : “इतर उपक्रमांवर खर्च करण्यापेक्षा या रक्तदान शिबिरासारखे आदर्शवत व स्तुत्य उपक्रम राबविणे अधिक संयुक्तिक ठरेल. या रक्तदान शिबिरामुळे आपले रक्त देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या रक्तात मिसळणार आहे, हि आपल्यासाठी गर्वाची बाब आहे. यातून आपला देशसेवेला हातभार लागणार आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: