पूजा चव्हाण प्रकरण – सौ.पूजा अरुण राठोड नावाच्या महिलेचा केला गर्भपात

यवतमाळ -: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता वेगळेच आणि गंभीर वळण लागले आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सौ.पूजा अरूण राठोड नावाच्या महिलेची गर्भपात झाल्याची नोंद आहे. याबाबत वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रकाशित केले आहे. गर्भपात करणाऱ्या महिलेचे नाव सौ. पूजा अरुण राठोड आणि वय २२ वर्ष दाखवण्यात आले. त्यामुळे संशय वाढला आहे. पूजा चव्हाणने बनावट नाव सौ पूजा राठोड धारण करून गर्भपात केला असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.

यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील 4 फेब्रुवारी रोजीचे सौ. पूजा अरुण राठोड या नावाची प्रिस्क्रिप्शन व्हायरल होत आहे. पूजा अरूण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का? याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाहीये. मात्र, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी फोन बंद करून ठेवल्यामुळे संशय अधिक बळावला आहे. गर्भपात करणारी महिला आणि पूजाचे वय २२ असे समान आहे. शिवाय पूजा चव्हाण प्रकरणात अरुण राठोड एक महत्त्वाचा दुवा आहे. पूजा राठोडच्या गर्भपाताच्या घटनेनंतर आठ दिवसनीच पूजा चव्हाणने आत्महत्या केली. या दोन्ही घटना परस्पर संबंधित आहेत का? याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे.

विशेष म्हणजे मंत्री संजय राठोड आणि अरूण राठोड यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये पूजा गर्भवती राहिल्याचे संभाषण आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही नवी माहिती महत्त्वपूर्ण मानली जाते आहे. प्रिस्क्रिप्शननूसार, सौ.पूजा अरूण राठोड ही ६ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली होती. तशी नोंद अहवालात आहे. तिचा वॉर्ड क्रमांक ३ होता आणि डॉ. श्रीकांत वराडे यांनी तिच्यावर उपचार केल्याचं रिपोर्टमध्ये दिसत असल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: