Saturday, May 30, 2026
PUNE

शिक्षण क्षेत्रातील संस्कार केंद्र असलेल्या विद्यालयांमध्ये महिलांचा वाटा अमूल्य – ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॅ. अ.ल.देशमुख

पुणे, दि. १२ — आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरूषांच्या बरोबरीने नाही, तर पुरूषांच्या पुढे जावून काम करीत आहेत, हे अभिमानाने सांगावेसे वाटते. संपूर्ण जगात शैक्षणिक क्षेत्रात पुणे शहराला मानाचे स्थान आहे. पुणे शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात माध्यमिक शाळेत सर्वात जास्त महिला शिक्षिका आहेत. संस्कार केंद्र असणाºया या विद्यालयांमध्येही महिलांचे योगदान अधिक दिसते. त्यामुळे पुण्यातील शिक्षणक्षेत्रातही महिलांचा वाटा अमूल्य आहे, असे मत शिक्षणतज्ज्ञ डॉ.अ.ल. देशमुख यांनी व्यक्त केले.

डेक्कन येथील लक्ष्मणराव आपटे प्रशालेच्या ११ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व पुणे कॉस्मोपॉलिटन लेडिज सर्कल ८१ (पीसईलसी) यांनी घेतले. यावेळी त्यांनी प्रशालेला ५७ हजार ६५० रुपयांचा धनादेश सुपुर्द केला. यावेळी संस्थेच्या नेहा सेठिया, रीटा गुप्ता, अनुपमा जैन, रुचा जैन, प्रशालेच्या प्राचार्य मेधा सिन्नरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

डॉ. अ.ल.देशमुख म्हणाले, आपटे प्रशालेतील विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असले तरी देखील बौद्धिकदृष्ट्या कमी नाहीत. प्रशालेतील विद्यार्थ्यांना बौद्धिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच नैतिक आणि मानसिकदृष्ट्याही सक्षम केले जाते. आमचा विद्यार्थी शिक्षणात अग्रेसर कसा असेल याबरोबरच तो समाजातील उत्तम नागरिक कसा घडेल, यासाठी देखील प्रयत्न केले जातात.  

नेहा सेठिया म्हणाल्या, आमची संस्था गेल्या २० वर्षांपासून विविध सामाजिक कार्यातून समाजाशी जोडली गेली आहे. वृध्दाश्रम, अनाथाश्रम, शाळा व गरजू विद्यार्थ्यांना संस्थेच्यावतीने मदत केली जाते. यंदाच्या वर्षी ममता फाऊंडेशन या संस्थेला दत्तक घेतले असून संस्थेतील एड्स ग्रस्त मुलांना धान्य, फळे, भाज्या, औषधे अशा गरजेच्या वस्तू देत आहोत. पीसीएलसी ८१ लेडीज सर्कल इंडिया चे अनेक भाग असून महिला, मुले व समाजातील गरजूंना मदत करणारी संस्था आहे, असे ही त्यांनी सांगितले. संस्थेतील विद्यार्थी व पालकांनी मनोगत व्यक्त केले. सुमेधा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. मेधा सिन्नरकर यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading