fbpx
Monday, May 13, 2024
LIFESTYLEPUNE

भारतातील प्रथम आणि सर्वात मोठ्या वीकॅनकन्सिव्ह या जनजागृती मोहिमेचे उद्घाटन

पुणे, दि.१२ –  लैंगिक व प्रजनन आरोग्य दिन २०२१ च्या निमित्ताने वीकॅनकन्सिव्ह या जनजागृती मोहिमेचे आणि पहिल्यांदाच निर्माण करण्यात आलेल्या वंध्यत्वावरील उपायांसाठी आधार देणाऱ्या परिसंस्थेचे उद्घाटन करण्यात आले. या व्यासपीठाद्वारे वंध्यत्वाविषयीची माहिती आणि या समस्येने ग्रासलेल्या जोडप्यांना आधार देण्याचे काम करण्यात येणार आहे. वंध्यत्वावर उपचार घेऊन यशस्वीपणे त्यावर मात करण्यासाठी अशा जोडप्यांना या परिसंस्थेमार्फत मदत करण्यात येणार आहे. 

या लैंगिक व प्रजनन आरोग्य जनजागृती परिसंस्थेद्वारे जगभरातील वंध्यत्व उपचारतज्ज्ञ, मीडिया भागीदार, आरोग्य क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्ती, सामाजिक संस्था आणि केअर गिव्हर्स एकत्र येत आहेत. जोडप्यांना वंध्यत्वावरील उपचार उपलब्ध करून देत त्यांना पालकत्वाचा आनंद उपभोगण्यासाठी मदत करण्याकरिता ही सकारात्मक आणि सक्षम परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. 


या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना ओएसिस फर्टिलिटीचे सीओओ सुधाकर जाधव म्हणाले, वंध्यत्वाच्या आव्हानाला सामोरे जाणारी अनेक जोडपी आहेत आणि त्यावर उपाय व उपचार शोधण्यासाठी त्यांना आधार, मदतीची आणि योग्य सल्ल्याची गरज असते. #वीकॅनकन्सिव्ह या संकल्पनेद्वारे आपण सर्व भागधारकांना एकत्र आणून एक परिसंस्था निर्माण करत आहोत व त्यामुळे वंध्यत्वाने बाधित जोडप्यांना एकाच ठिकाणी सर्व माहिती व मदत मिळू शकणार आहे.

“वंध्यत्वाने बाधित जोडप्यांना कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागते आणि त्यामुळे ते अनेकवेळा एकटे पडतात. वंध्यत्वाच्या विषयी बोलणे टाळले जाते आणि त्यावरील उपचारांची माहितीसुद्धा मिळत नाही. ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे,” असे मतओएसिस फर्टिलिटी हेड आणि वंध्यत्व-उपचार तज्ज्ञ डाॅ निलेश बलकवडे यांनी व्यक्त केले. त्यांनी वंध्यत्वाने बाधित जोडप्यांची माहिती व आकडेवारीही यावेळी सादर केली. 

या उपक्रमाचा उद्देश जोडप्यांपर्यंत योग्य माहिती पोहचविणे आणि त्यांना प्रेरित करणे तसेच लैंगिक व प्रजनन आरोग्याविषयी जनजागृती करणे हा आहे. वंध्यत्वावरील उपचार सुरक्षित आहेत, परवडणारे आहेत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित पद्धतीने ते केले जातात याची माहिती जोडप्यांना देऊन त्यांच्यात सकारात्मकता निर्माण करून हा उपक्रम राबविण्यात येईल. 


या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी ओएसिस इंडियातर्फे आपले हार्दिक स्वागत केले जात आहे. वंध्यत्वाची समस्या तुम्हाला भेडसावत नसली तरीही आपण या उपक्रमामध्ये सहभागी झाले पाहिजे कारण तुमच्या परिचयातील कोणीही त्यातून लाभ मिळवू शकेल. या उपक्रमाविषयी अधिकाधिक लोकांना माहिती द्या आणि सकारात्मकता पसरवा, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे. 

अनेकवेळा, आश्वासन आणि आशा या दोन गोष्टी अनेक रुग्णांना उपयुक्त ठरतात. शास्त्रीय अत्याधुनिक उपचार पद्धतीने आजच्या काळात अनेक पर्याय निर्माण केले आहेत. त्यामुळे त्याचा लाभ घेण्यापूर्वी लोकांपर्यंत ही माहिती पोचवणे गरजेचे आहे की हे शक्य आहे. वीकॅनकन्सिव्ह ही मोहीम याविषयी आहे. लोकांना सर्व माहिती, मदत आणि आधार देत त्यांच्यात विश्वास निर्माण केला जाणार आहे, असेही डाॅ.बलकवडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading