पीएमपीच्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

पुणे, दि. १२ – पीएमपीएमएल च्या निगडी आगार व चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी आगार प्रशासकीय इमारत येथे निगडी आगारातील कोविड कालावधीत कामकाज केलेल्या १५ महिला सफाई कामगार, कायम पदावरील ४ महिला वाहक व रोजंदारी पदावरील २ महिला वाहक अशा एकूण पीएमपीएमएल च्या २१ महिला कर्मचाऱ्यांचा चंदूकाका सराफ ज्वेलर्स यांच्या वतीने प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमात निगडी आगारातील कार्यालयीन, सफाई कामगार, वाहक अशा ५० महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमास निगडी आगार व्यवस्थापक श्री. शांताराम वाघेरे व त्यांच्या सौभाग्यवती तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी यांच्या सौभाग्यवती देखील उपस्थित होत्या. चंदुकाका सराफ यांच्यातर्फे सर्व महिलांना हळदी कुंकू व वान देण्यात आले. सदर हळदी कुंकु कार्यक्रमात विविध प्रकारच्या गेम्स घेण्यात आल्या व विजेत्या महिलांना बक्षीसे देण्यात आली.

Leave a Reply

%d bloggers like this: