Saturday, May 30, 2026
SportsTOP NEWS

‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघाची निवड चाचणी १८ व १९ फेब्रुवारी रोजी रंगणार

पुणे, दि. ११ – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुणे शहर संघाच्या खेळाडूंची निवड चाचणी १८ व १९ फेब्रुवारी २०२१ रोजी छत्रपती शिवाजी स्टेडीयम (मंगळवार पेठ) येथे घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव शिवाजीराव बुचडे यांनी दिली.

ही निवड चाचणी गादी आणि माती या दोन्ही विभागात होणार आहे. दोन्ही विभागात ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो, ७९ किलो, ८६ किलो, ९२ किलो, ९७ किलो व महाराष्ट्र केसरी गट ८६ किलो ते १२५ किलो वजनी गटांमध्ये ही निवड चाचणी होणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ ते दु. १२ या वेळेत खेळाडूंची वजने घेतली जाणार आहेत.

या निवड चाचणीमध्ये केवळ पुणे शहरातील खेळाडूंचा असणे तसेच तालीम संघाचा नोंदणीकृत खेळाडू असणे बंधनकारक असणार आहे. खेळाडूंनी आधारकार्डची मूळ प्रत व दोन फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच सर्व खेळाडूंना कोरोना विषयीच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

अधिक माहितीसाठी खेळाडूंनी राष्ट्रीय तालीम संघ, मंगळवारपेठ येथे किंवा अविनाश टकले, योगेश पवार, गणेश दांगट, सागर भोंडवे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading