श्रीमद राजचंद्र मिशनच्या वतीने व्हर्चुअल ग्लोबल युथ फेस्टीवलचे आयोजन

पुणे, दि. ११ – श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर या आध्यात्मिक संघटनेच्यावतीने व्हर्चुअल ग्लोबल युथ फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजल्यापासून  http://youthfestival.srmd.org/ या वेबसाईटवरुन युथ फेस्टीवल लाईव्ह होणार असून वेबसाईटवरुन नावनोंदणी देखील करता येणार आहे. १४ विभिन्न देशाचे युवक या फेस्टिवलमध्ये सहभागी होणार आहेत. गुरुदेव श्री राकेशभाई, ब्रह्माकुमारी सिस्टर शिवानी, पूज्य ज्ञानवत्सल स्वामी युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. 

मुकुंदनगर येथील श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर या संस्थेतून देखील युथ फेस्टिव्हलचे काम केले जात आहे. या वर्षी फेस्टीवलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युथ फेस्टीवलच्या सुरुवातीला गुरुदेव श्री राकेशभाई तरुणांना आध्यात्मिक मार्गदर्शन करतील. त्यानंतर पूज्य ज्ञानवत्सल स्वामी, ब्रह्माकुमारी सिस्टर शिवानी आणि पूज्य गौर गोपाल दास आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. 

कैलाश खेर, कबीर कॅफे, इंदिरा नाईक आणि राधिका सूद हे नामांकित संगीत कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. युवकांच्या विकासासाठी  श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूरची दृष्टी  सत्संग, निस्वार्थ सेवा, साधना, संस्कृती आणि क्रीडा या स्तंभांवर आधारित आहे. व्हर्चुअल ग्लोबल युथ फेस्टीवल या समग्र  ५ स्तंभावर आधारित आहे.  

बेस्ट सेलर लेखक डॉ. दीपक चोपडा, डीन इÞडालीन केसनर, स्वदेस फाऊंडेशनचे रॉनी स्क्रूवाला, अभिनेत्री डॉ. आदिती गोवित्रीकर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शन सत्रांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. 
गुरुदेव श्री राकेशभाई म्हणाले, प्रचंड उर्जा, उत्साह आणि शक्ती ही आजच्या युवकांची संपत्ती आहे. त्यांच्याकडे उत्साह आहे परंतु त्यांना दिशा दाखविणे आवश्यक आहे. युवा शक्तीचा सक्षम आणि सकारात्मक रुपाने उपयोग करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: