मॉडर्न महाविद्यालयाचा यशाचा चौकार

पुणे, दि..११ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त दिले जाणारे पुरस्कार प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) , शिवाजीनगर, यांना मिळाले आहेत.

यानिमित्त मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय(स्वायत्त) शिवाजीनगर पुणे ५ च्या वतीने आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.हे चार पुरस्कार पुढीलप्रमाणे
१.उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार
२. उत्कृष्ट महाविद्यालय ( क्रीडा) पुरस्कार
३. महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. अंजली सरदेसाई यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार
४. राघवेंद्र शावळकर यांना गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मॉडर्न महाविद्यालयाला सलग पाचव्यांदा डॉ.वसंतराव पवार क्रीडा करंडक बहाल करण्यात आला. या आनंदसोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. या कार्यक्रमाला पोलीस सहआयुक्त डॉ रवींद्र शिसवे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलिमा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिक्षण हे अतिशय महत्त्वाचे आहे,वेळच्या वेळी शिक्षणावर लक्ष देणे महत्वाचे आहे.,तुमच्याकडून शिक्षण ही गोष्ट कोणीही हिरावून घेवू शकणार नाही.असे मत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मांडले.आयुष्यात सगळे शिक्षण महत्त्वाचे आहे,गणित, भाषा, मानसशास्त्र हे विषयसुद्धा महत्वाचे आहेतच,आपण काय सांगतो हे समोरच्याला कळणे फक्त मानसशास्त्र सारख्या विषयामुळे कळते.छोट्या छोट्या गोष्टी माणसाला विकासापर्यंत घेवून जातात,अनेक लहान गोष्टींमधून प्रेरणा घेवून आपल्यातली उर्जाशक्ती जिवंत ठेवणे आवश्यक असते.विद्यार्थ्यांनी सतत मार्गक्रमण करत राहावे असे ते पुढे म्हणाले.शिक्षण देणे आणि विद्यार्थी घडवण्याचे महत्वाचे काम या महाविद्यालयाने केले आहे.समाजातला विद्यार्थी घडवण्याचे महत्वपूर्ण काम हे मॉडर्न महाविद्यालय करत आहे.
विचाराची निर्मिती भावनेतून होते. समाजाला विचार देण्याचं काम हे अतिशय मोठे आहे.हा विचार देण्याचे काम या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने, मॉडर्न महाविद्यालयाने नेहमीच केले केले .समाजाला विचारांनी उर्जावान करण्याचं कामप्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष मा.प्रा. डॉ.गजानन एकबोटे यांनी केले आहे.आणि अनेक वर्ष ते हे काम करत आहेत असे गौरवोद्गार आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी काढले .प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न महाविद्यालयाने मिळवलेले यश उलेखनीय आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेचा प्रवास अतिशय खडतर आहे,दगडासारखे वाईट अनुभव,फुलांसारखा चांगला अनुभव नक्कीच या संस्थेला आलेला असणार ,पण वाटेतले दगड बाजूला सारून , वाटेतली फुले घेवून त्यांच्या पासून ऊर्जा घेवून या संस्थेने आपली वाटचाल यशस्वीपणे सुरू ठेवली आहे. संस्थेने आधुनिकतेची आणि परंपरेची सांगड घालून वाटचाल आपली यशस्वी वाटचाल चालू ठेवली आहे. असे विचार पोलीस सहआयुकत डॉ.रवींद्र शिसवे यांनी व्यक्त केले.
तळागाळातील विद्यार्थ्याना,होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देवून ,त्यांना शिक्षणात मदत करून मॉडर्न महाविद्यालयाने आणि या संस्थेने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कम केलेलं आहे.समाजाच्या गरजा लक्षात घेवून महाविद्यालयाने विविध नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. डेटा सायन्स सारखे अभ्यासक्रम सुरू करून महाविद्यालय अनोख्या पद्धतीने आपली गुणवत्ता सिद्ध करत आहे.असे अभ्यासक्रम सुरू करणारे मॉडर्न महाविद्यालय हे शिक्षणाचे महत्वाचे केंद्र आहे.असे मत याप्रसंगी प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे यांनी व्यक्त केले.ते म्हणाले,महाविद्यालयाने समाजाला अनेक चांगले विद्यार्थी दिले. सामाजिक,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रात हे विद्यार्थी महाविद्यालयाचे नाव मोठे करत आहेत.महाविद्यालयाने पोलीस वसाहतीतील महिलांना रोजगार मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.महाविद्यालय सामाजिक बांधिलकी नेहमीच जपत असते.मॉडर्न महाविद्यालयाची कामगिरी नेहमीच नेत्रदीपक असते, असे मत यावेळी महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा प्रा.ज्योत्स्ना एकबोटे यांनी व्यक्त केले.प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे हे पहिले महाविद्यालय प्रगतीत नेहमीच अग्रेसर असते असे त्या म्हणाल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न ९०० महाविद्यालयात मॉडर्न महाविद्यालय नेहमीच आघाडीवर असते असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र झुंजारराव यांनी व्यक्त केले.महाविद्यालयाच्या विविध पैलूंचीओळख त्यांनी उपस्थितांना करून दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये दिल्ली येथील राजपथावर २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या संचालनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यांची नावे पुढीलप्रमाणे
१.तनया नलावडे
2.ज्ञानवी ककोनिया
३.अनिकेत मोरे
या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.आफशा माशायक हिचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मॉडर्न महाविद्यालयाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून महाविद्यालयाला दुसऱ्यांदा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या कार्यक्रमाला महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा प्रा.ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्याध्यक्ष डॉ. अरविंद पांडे व सचिव प्रा.शामकांत देशमुख उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार प्रा.शामकांत देशमुख यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रेणू भालेराव यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: