मायक्रोमॅक्सचा इन नोट १ आणि इन १बी स्मार्टफोन्ससह महाराष्ट्रातील मेनलाईन रिटेल मार्केटमध्ये प्रवेश

पुणे, दि. १० – भारतातील स्वतःचा स्मार्टफोन तसेच ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, मायक्रोमॅक्स इंफॉरमॅटिक्स लिमिटेडने आज त्यांच्या ‘इन’ ब्रँडच्या अंतर्गत लाँच करण्यात आलेल्या नवीनतम स्मार्टफोन्ससह महाराष्ट्र राज्यातील ऑफलाईन रिटेलमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील इन स्मार्टफोन्सची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी,कंपनी महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये एमवी वेंचर्ससह भागीदारी करत आहे.

या घोषणेबद्दल बोलतांना राहुल शर्मा, सह-संस्थापक, मायक्रोमॅक्स, इंडिया म्हणाले की आमच्या इन स्मार्टफोन्सला संपूर्ण भारतातील ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. जेव्हा तुम्ही #इंडियाकेलिये सह पुनरागमन करता जे प्रेम आणि विश्वासाशी संबंधित आहे  तेव्हा आम्हाला  निरंतर परिश्रम करत एक बेंचमार्क स्थापित करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध राहू हे सुनिश्चित करण्यासाठी  हा आमचा प्रयत्न आहे आणि रिटेल स्टोअर मध्ये आमची उपस्थिती याच दिशेने एक पाऊल आहे.

रिटेल विस्ताराचा एक भाग म्हणून,  ग्राहकांना प्रवेश मिळवून देण्याच्या अनुषंगाने मायक्रोमॅक्स महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, आसाम, नागालँड आणि त्रिपुरा या सात राज्यांतील अग्रणी चॅनल पार्टनर्ससह भागीदारी करीत आहे. मागील एक दशकापासून लोकशाहीकरण तंत्रज्ञानात मायक्रोमॅक्स अग्रगण्य आहे आणि नवीन युगातील भारतीय ग्राहकांना उत्तम कार्यक्षमता असलेले  उत्पादने प्रदान करण्याचा कंपनीचा  हेतू आहे जे तंत्रज्ञानात उत्कृष्ट असून सर्वोत्तम तंत्रज्ञान देखील प्रदान  करते. अत्यंत वेगवान प्रदर्शन प्रदान करणारे स्मार्टफोन्स प्युअर अँड्रॉइड ओएस तंत्रज्ञानाने सुसज्जित आहे ज्यामध्ये आम्ही तुम्हाला जाहिराती किंवा तुमचा डेटा विकत नाही तर तुम्हाला एक उत्तम आणि सुरक्षित अनुभव प्रदान करतो.

ब्रँडच्या  इन सिरीजच्या यशस्वी लाँच नंतर मध्यम रेंज मध्ये उपलब्ध असलेले इन नोट १ या स्मार्टफोन्स जे भारतीय शैलीला तर बजेट चॅम्पियन  इन १बी  स्मार्टफोन्स नवीन भारतीय ग्राहकांना परिभाषित करते.तसेच मायक्रोमॅक्स,वेळेवर सॉफ्टवेअर अपडेट करून वारकर्त्यांना उत्तम अनुभव प्रदान करण्यासाठी देखील निरंतर प्रयत्न करीत आहे जे  इन सिरीजसाठी ब्रँडचे वचन आहे.

मायक्रोमॅक्सचे संपूर्ण भारतभर किरकोळ विक्रेत्यांचे आणि वितरकांचे मजबूत नेटवर्क आहे ज्यांचा उद्देश्य त्यांच्या ग्राहकांना  विक्रीच्या आधी ते विक्री नंतरच्या सेवांपर्यंत समग्र सुविधा प्रदान करण्याचा आहे. याव्यतिरिक्त ब्रॅंडने  60 मिनिट्स एक्सप्रेस सर्विस प्रॉमिस, सिंगल डे प्रॉब्लम रिजॉल्यूशन आणि क्विक क्वेरी क्लोजर थ्रू वॉट्सअँप  यांसारख्या पुढाकारांच्या माध्यमातून देखील स्वतःच्या सेवांचा  विस्तार केला आहे. सध्या ब्रॅंडचे संपूर्ण भारतात १००० पेक्षा अधिक सर्विस सेंटर्स आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: