पाठ, मान दुखीवरील उपचार शिबिर संपन्न

पुणे, दि. १० – कोरोनाकाळात बदललेल्या जीवनशैलीमुळे व संगणकीय डिव्हाइसेसच्या अती वापरामुळे अनेकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. यामुळे होणाºया आजारांसाठी व आजार होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यावी याकरीता विश्वानंद केंद्र सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह मेडिसिन आणि केरळ आयुर्वेद लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मार्गदर्शन व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

पुणे -सातारा रस्त्यावरील वाळवेकर नगर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन संगणक उद्योजिका बन्सी मेहता आणि मोनित मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अरूण दास, विश्वानंद केंद्राचे डॉ. अजित मंडलेचा, डॉ.गौस मुजावर, डॉ. आदिती आदी उपस्थित होते. यावेळी सहभागी झालेल्या नागरिकांना आयुर्वेद उपचार, फिजिओथेरपीस्ट मार्फत व्यायामासंबंधीचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच केरळ आयुर्वेद लिमिटेड या कंपनीतर्फे मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. 

डॉ. अजित मंडलेचा म्हणाले, शिबिरामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये संगणक, मोबाईलच्या अती वापरामुळे डोळ््यांवर येणारा ताण आणि त्याचबरोबर पाठ, मान, मणक्याचे व स्नायू दुखीचे त्रास दिसून आले. त्याचबरोबर शाळकरी मुलांमध्ये झोप कमी लागणे आणि वजन वाढीसारख्या समस्या जास्त दिसून आल्या. विश्वानंद केंद्रातर्फे सहभागी झालेल्या नागरिकांना त्यांच्या समस्येनुसार तज्ज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन, आयुर्वेदिक औषधे आणि योग्य व्यायामाचा सल्ला देखील देण्यात आला, असे ही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: