आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स तर्फे एबीएसएलआय डिजिशील्ड टर्म योजना सादर

पुणे, दि. १० – आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड (एबीसीएल) या कंपनीची आयुर्विमा क्षेत्रातील उपकंपनी असलेल्या आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स तर्फे (एबीएसएलआय) ग्राहकांच्या विमा संरक्षणाच्या अद्वितीय गरजा भागविण्यासाठी, हायपर-पर्सनलाईज्ड (उच्च-वैयक्तिकृत) स्वरुपाची टर्म योजना, एबीएसएलआय डिजिशील्ड सादर करण्यात आली आहे. या एकल योजनेत ग्राहकांना अनेक पर्याय मिळू शकतात, तसेच, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अतिरिक्त लाभ, संयुक्त विम्याचे कवच, गंभीर आजारासाठीचे कवच आणि रायडरचे पर्याय या बाबीही उपलब्ध आहेत. ग्राहकांना आणि त्यांच्या प्रियजनांना सर्वंकष आर्थिक सुरक्षा मिळण्यासाठी वैयक्तिक गरजांनुरुप या योजनेचे स्वरूप बनविता येते.

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांत संरक्षणाच्या गरजा विविध स्वरुपाच्या असतात. या गरजांची दखल घेत त्या-त्या वेळी संरक्षणाच्या योजना आखण्याची सुविधा या हायपर-पर्सनलाईज्ड योजनेमध्ये आहे. मृत्यू-पश्चात लाभ देणे व उत्पन्नाला पर्यायी साधन म्हणून काम करणे, या व्यतिरिक्त एबीएसएलआय डिजिशील्ड योजना व्यापक आर्थिक नियोजनातही सहाय्य करते.

पारंपारिक टर्म प्लॅन्सपेक्षा या योजनेत काही वेगळेपण आहे. ही योजना ग्राहकांना त्यांच्या हयातीच्या कालावधीतही सर्व्हायव्हल लाभ पर्याया चे फायदे मिळवून देते. याव्यतिरिक्त, पूर्वनिर्धारित सेवानिवृत्तीच्या वयात विमाराशीची रक्कम कमी करण्यासाठी एक अनन्य लवचिकताही या पॉलिसीमध्ये आहे. यातून ग्राहकांना त्यांच्या थकित दायित्वांनुसार आणि आयुष्यातील टप्प्यांनुसार आपले विमाकवच आखता येते. विमाराशीत कपात करता येण्याची सुविधा असणारी व आजीवन विमाकवच देणारी ही आयुर्विमा क्षेत्रातील एकमेवाद्वितीय अशी योजना आहे. पॉलिसीधारकाच्या वयाच्या शंभरीपर्यंत ती कवच पुरविते.

वैयक्तिक गरजांनुसार पूर्णपणे आखता येण्याजोग्या वैशिष्ट्यांबरोबरच, या योजनेत ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी, प्रीमियम भरण्याचे विविध पर्याय, पॉलिसीची मुदत आणि मृत्यू-पश्चात लाभ मिळण्याबाबतचे पर्यायदेखील उपलब्ध आहेत. ही सर्वांगीण योजना ग्राहकांवरील उत्तरदायित्वाचे ओझे कमी करण्यास मदत करते, त्यांच्या प्रियजनांना संरक्षण देते, सेवानिवृत्तीनंतरचे लाभ देते आणि पुढील पिढीची ध्येये साकारण्यास त्यांना सहाय्य करते.

एबीएसएलआय डिजिशील्ड योजना सादर करण्याविषयी आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी कमलेश राव म्हणाले, सध्याच्या अनिश्चित काळात वैयक्तिकृत ऑफर्स देणाऱ्या लवचिक स्वरुपाच्या आर्थिक विमा योजनांची गरज निर्माण झाली आहे. एबीएसएलआयची डिजिशील्ड योजना ही आमच्या ग्राहक-केंद्रित धोरणाची साक्ष वर्तविणारी विशिष्ट योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिकृत करता येण्याजोग्या विविध वैशिष्ट्यांद्वारे सर्वसमावेशक सोल्युशन निर्माण करण्यास आणि स्वतःसाठी व कुटुंबासाठी अगदी योग्य ठरेल असे विमा कवच बनवून घेण्यास आमचे नवीन-युगातील ग्राहक आता सक्षम बनतील.

Leave a Reply

%d bloggers like this: