‘कोकण बिझनेस फोरम’ आयोजित काळी मिरी अभ्यास दौऱ्यास प्रतिसाद

पुणे, दि. ८ – कोकणात शास्त्रीय पद्धतीने काळी मिरीची लागवड वाढावी या उद्देशाने ‘कोकण बिझनेस फोरम’ने आयोजित केलेल्या अभ्यासदौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला.फोरम चे संस्थापक संजय यादवराव यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा अभ्यासदौरा रविवार, ७ फेब्रुवारी रोजी बांदिवडे (पालयेवाडी) ता.मालवण जि. सिंधूदुर्ग येथे आयोजित करण्यात आला होता. 

जगभर  विशेषत: अमेरिका आणि युरोप येथे मागणी असते असे काळी मिरी हे  भविष्यातील कोकणातील महत्त्वपूर्ण ग्लोबल कृषी उत्पादन असणार आहे.’काळीमिरी लागवड’ या विषयाची संपूर्ण माहिती या अभ्यास दौऱ्यामध्ये काळीमिरी शेतीतील यशस्वी शेतकरी मिलिंद  प्रभू व कृषी तज्ञ डॉक्टर जे.एल. पाटील यांनी दिली.

मु.पो.बांदिवडे (ता.मालवण, जि.सिंधुदूर्ग)येथे काळीमिरी प्रत्यक्ष लागवड पहाणी व काढणी पश्चात तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक तसेच  शंकांचे निरसन असा संपूर्ण एकदिवसीय अभ्यास दौरा कोकण बिझनेस फोरम च्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थीना प्रगतीशील शेतकरी श्रीमती हळदणकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. प्रशांत कातकर यांनी संयोजन केले. राज्यातून ३५ जण सहभागी झाले.

Leave a Reply

%d bloggers like this: