संक्रांतीनिमित्त निबंध स्पर्धेत ६३ जणांचा सहभाग

पुणे, दि. ८ – सहारा प्राँडक्शन हाऊस आणि अक्षदा विवाह पुनर्विवाह संस्थेतर्फे संक्राती निमित्तानं “हळदी कुंकवाचा मान फक्त सुवासिनीचा की प्रत्येक स्त्रीचा ? ‘ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.स्पर्धेत ६० महिलांनी आणि ३ पुरुष स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला

धायरी येथे रविवारी पारितोषिक वितरण समारंभ झाला. डॉ. राजेंद्र भवाळकर अध्यक्षस्थानी होते.

मलेशिया येथुन सहभागी झालेल्या सौ.सिमा इंग्रोले यांनी प्रथम क्रमांक पटकावला.तर सुनिता कसबे यांनी दुसरा ,सौ.रुपा साळवी यांनी तिसरा तर उत्तेजनार्थ सौ.वेदवती कोगेकर यांनी बक्षीस मिळवले..वि.ग.सातपुते यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांचे कौतुक केले गेले.

ब्रेस्ट कँन्सर या विषयावर सौ.सरिता सोनावले यांनी मार्गदर्शन केले.दयानंद इरकल, स्वाती हणमघर, सुनिल नाईक , सौ.ज्योती आढाव ,सुहास चव्हाण ,अक्षदा विवाह संस्थेच्या सौ.रसिका भवाळकर , नगरसेविका अनिता इंगळे ,सुनिता खंडाळकर ,संगिता नाईक ,शालिनी चांदणे,अश्विनी सानप, अँड.योगिनी कानडे आदी उपस्थित होते.निरनिराळ्या समाजप्रबोधन करु शकतील अशा विषयावरील शॉर्ट फिल्म ची निर्मिती करण्याचा मानस डाँ.राजेंन्द्र भवाळकर यांनी या प्रसंगी व्यक्त केला.

Leave a Reply

%d bloggers like this: