शिक्षणाधिकारी प्रा. विठ्ठलराव भुसारे व दिपकराव पंडीत यांचा भव्य सत्कार

कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुका शाखा परभणीचा उपक्रम

परभणी, दि. ७ – शिक्षण क्षेत्रात प्रशासन व शिक्षक संघटन महत्वाची भूमिका बजावतात! शिक्षक संघटन प्रशासनावर व प्रशासन शिक्षक संघटनावर प्रभाव पाडीत असतात! परभणी जिल्ह्यात मागील महिन्यात या दोनही विभागात दोन महत्वाचे बदल झाले. जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार उपशिक्षणाधिकारी प्रा.विठ्ठलराव भुसारे यांच्याकडे तर कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या रिक्त झालेल्या जिल्हा अध्यक्ष पदावर जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळा, देवलगाव अवचारचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक दिपक पंडीत यांची नियुक्ती झाली. या दोनही मान्यवरांचा सत्कार समारंभ कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुका शाखा परभणीच्या कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष सतीश कांबळे यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडला.

शाल,पुष्पहार,पुष्पगुच्छ व मिठाई वाटून मोठ्या थाटामाटात पार पडलेल्या या समारंभास तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक शिक्षक उपस्थित होते.
आपल्या पाल्याला डॉक्टर म्हणून घडविणारे आदर्श पालकांची भूमिका निभावणारे मारोती रणवीर व आपल्या पाल्याला जिल्हापरिषदेच्या शाळेत शिकविणाऱ्या आदर्श शिक्षिका कमल दवंडे यांचा यावेळी शिक्षणाधिकारी व विभागीय अध्यक्षांनी सत्कार केला.

अशोक लोखंडे व यु.सी.घुगे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या या कार्यक्रमास जिल्हा कोषाध्यक्ष जयद्रथ गडेराव, जिल्हा संघटक मारोती वाघमारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अरविंद दवणे यांच्यासह परभणी तालुका अध्यक्ष प्रकाश पंडीत, सचिव विशाल प्रधान, कार्याध्यक्ष देवानंद फुलवरे, सचिन सोनडवले, पांडुरंग सरकटे, सुश्मित लिंगायत, राजेंद्र धनशेट्टी, विशाल कांबळे, युवराज अंधारे, संभाजी वागतकर, विजय जल्हारे यांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: