Saturday, June 20, 2026
NATIONALTOP NEWS

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला; महापुरात अनेकजण बेपत्ता

देहरादून, दि. 7 – उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात आज सकाळी अत्यंत दुर्देवी घटना घडली. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहात अनेकजण बेपत्ता झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्याच्या तपोवन परिसरात हिमकडा कोसळला. हिमकडा कोसळल्यानंतर रैनीसह अनेक गावांना याचा तडाखा बसला आहे. जोशी मठ परिसराजवळच ही घटना घडली असून हिमस्खलन झाल्याने ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच धौलीगंगा नदीच्या प्रवाहात वाढ झाल्यानंतर गंगेच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, जोशी मठाच्या नुकसानीबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्रपाण्याच्या तडाख्यात धौलीगंगा नदीवरील दोन पुल वाहून गेले असून, एसडीआरएफने मदत कार्य सुरू केले आहे. राज्य सरकारने अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी जोशी मठाजवळ एक हेलिकॉप्टर पाठवले आहे. त्याचबरोबर केंद्राकडे एनडीआरएफच्या तुकड्या पाठवण्याची मागणी केली आहे. या घटनेत पाण्यामुळे नदीकाठावरील घरांना फटका बसला असून, अनेक जण वाहून गेल्याचे कळते आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading