fbpx
Thursday, September 28, 2023
PUNE

एल्प्रो इंटरनॅशनल स्कुल कडून ‘पॅन्जीया- द ग्लोबल व्हिलेज’ ही दोन दिवसीय विशेष ऑनलाइन परिषद  संपन्न 

 पुणे –  जागतिक अनुभवाच्या अनुषंगाने पुणे येथील एल्प्रो इंटरनॅशनल स्कुल (ईआयएस) त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध करुन देण्यात अग्रेसर आहे. ईआयएसने लंडन मधील   वॅपिंग  हायस्कूल एण्ड स्किल्सफेयर एज्युकेशन या त्यांच्या भागीदार शाळेच्या सहकार्याने एक असे अद्वितीय व्यासपीठ डिझाईन केले  जे 21 व्या शतकातील जागतिक शिक्षणाची व्याख्या करते.

नुकतीच पॅन्जिया- द ग्लोबल व्हिलेज’ ही दोन दिवसीय विशेष ऑनलाइन परिषद पार पडली. ज्यात आशिया, युरोप आणि दक्षिण अमेरिका आदि वेगवेगळ्या देशांतील ७ शाळांनी सहभाग घेतला होता ज्यात विविधतेतून एकतेचा संदेश दिला गेला.  ‘करुणा आणि सहकार’ या मूलभूत संकल्पनेसह ही परिषद पार पडली. यूके हाऊस ऑफ लॉर्ड्सचे लॉर्ड डेव्हिड इव्हान्स, (यूके येथील संसद सदस्य तसेच ब्रिटिश प्रकाशक, उद्योजक आणि ईआईएसचे सल्लागार) यांच्या हस्ते पॅन्जियाचे उद्घाटन झाले त्यांनी पॅन्जिया या संकल्पनेचे कौतुक केले आणि त्यास “ग्लोबल व्हिलेज” असे संबोधले.
यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात एल ऑटोर (सहयोगात्मक कथा लेखन), ग्लोबल जिग्यासा (वर्ल्ड क्विझ), सिंथेसिस (ग्रुप डिस्कशन), एल कॅंटो (कोलाब्रेटीव्ह सिंगिंग) आणि कलाकरी (कला प्रदर्शन) यासारख्या अनेक मनोरंजक आयोजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनसाठी  विलक्षण अनुभव सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनसाठी विचारधारा, संस्कृतीची देवाणघेवाण, विविध अनुभव आणि जागतिक जागृतीच्या उद्देशाने तयार केलेले कार्यक्रम हे जागतिक संस्कृतीचे एकत्रीकरण होते. समकालीन शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय अनुभवांसह विद्यार्थ्यांच्या अनुभवांमध्ये या कार्यक्रमांची भर पडली.  व्हॅलेडिक्टरी सोहळ्याच्या निमित्ताने कॉमनवेल्थच्या सरचिटणीस बॅरोनस पेट्रीसिया स्कॉटलंड यांनी जागतिक नागरिकत्वाला प्रोत्साहित करण्याच्या ईआयएसच्या बांधिलकीचे कौतुक करणारा एक सुंदर संदेश सामायिक केला. त्या म्हणाल्या, “आम्ही भविष्याकडे मोठ्या आशेने आणि आपल्या जगाला एक चांगले स्थान बनवण्याच्या मोठ्या योजनांकडे पहात आहोत, जिथे आपण सर्व आरोग्य, शांती आणि समृद्धीने एकत्र राहात आहोत. हे मला वाटते की पॅन्जियाला प्रेरणा देण्याचा हा हेतू आणि कल्पना देखील खुप अनोखी आहे. पॅन्जिया ग्लोबल व्हिलेज मधील सर्वांचा सहभाग उत्साहवर्धक आहे. ” ईआयएसच्या संचालक-प्राचार्य डॉ. अमृता वोहरा म्हणतात, “खंडांमध्ये प्रत्यक्ष अंतर असू शकते; परंतु आमचे विचार  जग एकत्रित करतात. अश्या प्रकारचे उपक्रम” जसे की, पॅन्जिया विद्यार्थ्याना उद्या-भविष्यासाठी अधिक सुसज्ज आणि चांगले तयार करण्यास मदत करतील. यामुळे आपल्यात काही चांगले जीवन-कौशल्ये आणि मूल्ये समृद्ध झाली आहेत.

कम्युनिकेशन्स अँड इंटरनॅशनल कोलॉबोरेशन्सच्या प्रमुख आणि ईआयएस येथील पॅन्जियाच्या संयोजिक सुगंधा खंडेलवाल म्हणाल्या, “पॅन्जियाद्वारे प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या हितसंबंधांना पुढे ठेवण्यासाठी प्रेरित केले गेले होते. वेगवेगळ्या राष्ट्रांचे विद्यार्थी पुढे आले आणि सहभागी झाले, त्यांनी त्यांचे विचार आणि त्यांचे शिक्षण एकमेकांशी सामायिक केले हे पाहून आम्हाला आनंद झाला. त्या म्हणाल्या बॅरोनस पेट्रीसिया स्कॉटलंड यांचे कौतुक केले जावे. त्यांच्यामुळे आम्हाला प्रचंड प्रेरणा मिळाली आहे आणि अखंड जगाच्या एकात्मतेचा आपला विश्वास दृढ झाला आहे .

 स्किल्सफेयर चे संस्थापक आणि एमडी अनन्श प्रसाद म्हणाले, “पॅन्जिया – ग्लोबल व्हिलेज ही एक आश्चर्यकारक कल्पना आहे. ज्या प्रकारे त्याची अमंबलवजावणी झाली आहे ते पाहून मला प्रचंड आनंद झाला. ८ वेगवेगळ्या देशांतील शाळांमधील सहभागी आणि मायके रॅन, क्लेअर वार्ड आणि , लॉर्ड इव्हान्स ऑफ वॅटफोर्ड पॅन्जिया २०२१ यासह विविध क्षेत्रातील असंख्य लोंकामधुन साकार झालेली ही एक आगळी वेगळी संकल्पना होती. , ही एक वेगळी रचना होती. स्किल्स्फेअर एज्युकेशन करुणा आणि सहकार्याच्या अनुषंगाने ग्लोबल व्हिलेज उभे  करण्यास उत्सुक आहे. ”

Leave a Reply

%d bloggers like this: