सई बनली जाई जोशी

झी युवावरच्या ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. एकीकडे नचिकेत आणि सई यांच्यातलं हळूवार फुलणारं प्रेम आणि दुसरीकडे अप्पांचा फॉरेन रिटर्न नचिकेतला असलेला विरोध, अप्पा आणि नचिकेतमधल्या नात्यांचे हे चढ उतार पाहण्यामध्ये प्रेक्षक चांगलेच गुंतलेत. यामुळे सुरुवातीपासूनच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. नचिकेतच्या आईमुळे या मालिकेत नवीन वळण आले.सई आणि नचिकेतच्या आईची पहिली भेट देखील काही फारशी चांगली नव्हती त्यामुळे जसं अप्पांना नचिकेत मान्य नाही तसेच नचिकेत आणि सईचं नातं नचिकेतच्या आईला देखील मान्य नाही. त्यात भर म्हणून अप्पा आणि नचिकेतच्या आई मधले वाद अगदी विकोपाला गेले आहेत. अशा सर्व परिस्थितीत नचिकेत आणि सईच्या नात्याला नचिकेतच्या आई कडून मान्यता मिळावी म्हणून सई नचिकेतच्या आईला इंप्रेस करण्याचं ठेवते आणि त्यात सईची आजी एक युक्ती लढवते. सईच्या आजीच्या युक्तीप्रमाणे सई एका नव्या वेशात नचिकेतच्या आईला भेटते. आता ती सई नसून जाई जोशी झाली आहे. जाईचं राहणीमान, बोलण्याची पद्धत ही सगळीच सईपेक्षा खूप वेगळी आहे. तोकडे केस, मॉडर्न कपडे, डोळ्यांवर चष्मा आणि बोलताना चक्क इंग्रजी भाषेचा वापर जाई करतेय त्यामुळे ती सई आहे असा दूर दूर पर्यंत कोणाला संशय येईल असं वाटत नाही. पण आता नचिकेतच्या आईला जाई हीच सई आहे हे कळणार का? सई जाईच्या वेशात नचिकेतच्या आईला इम्प्रेस करू शकेल का? अप्पांना सई आणि आजीच्या या प्लॅन बद्दल कळेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.  

Leave a Reply

%d bloggers like this: