एल्गार परिषद – शरजील उस्मानीसह आयोजकांवर कारवाई करण्याची पुणे भाजपची मागणी

पुणे – अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा वादग्रस्त विद्यार्थी शरजील उस्मानी याच्यावर कलम १२४ (अ) कलमानुसार गुन्हा दाखल करावा, संयोजकांवर कारवाई करावी आणि आरोपींना तातडीनं अटक करावी मागण्यांसाठी आज भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीनं पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन निवेदन दिलं.

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, उपमहापौर सरस्वती शेंगडे, माजी खासदार प्रदीप रावत, आमदार भीमराव तापकीर, आमदार मुक्ताताई टिळक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, शहर सरचिटणीस गणेश घोष, दत्ताभाऊ खाडे, राजेश येनपुरे, संदीप लोणकर, दीपक नागपूरे, भाजयुमो प्रदेश चिटणीस आणि या प्रकरणी फिर्यादी असलेले प्रदीप गावडे, भाजयुमो शहराध्यक्ष बापू मानकर यांच्यासह पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात भाजपने म्हटले आहे की, दि. ३० जानेवारी २०२१ रोजी आपल्या स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्री गणेश कला क्रीडा मंदिर या सभागृहात ‘एल्गार परिषद २०२१’ नावाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात आयोजकांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजिल उस्मानी याला भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते. शरजिल उस्मानी सदर कार्यक्रमास हजर राहिला व आपल्या भाषणात त्याने भारतीय संघराज्यविरोधात व हिंदूंविरोधात अत्यंत आपत्तीजनक व भडकावू विधाने केली. शरजिल विरोधात ऍड प्रदीप गावडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार ३ फेब्रुवारी २०२१ रोजी स्वारगेट पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक 153A नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरजिलने आपल्या भाषणात हिंदू समाजाचा अवमान करणारे विधान केले आहे, शरजिलचे तंतोतंत विधान असे आहे की “‘आज का हिन्दू समाज, हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है। ये जो लोग लिंचिंग करते हैं, कत्ल करते है, ये कत्ल करने के बाद अपने घर जाते है तो क्या करते होंगे अपने साथ? कोई नए तरीके से हात धोते होंगे, कुछ दवा मिलाकर नहाते होंगे। क्या करते है ये लोग की वापस आकर हमारे बीच खाना खाते है, उठते-बैठते है, फिल्में देखते है। अगले दिन फिर किसीको पकड़ते है फिर कत्ल करते और नॉर्मल लाईफ जीते है। अपने घर में मोहब्बत भी कर रहे है, अपने बाप का पैर भी छू रहे है, मंदिर में पूजा भी कर रहे है, फिर बाहर आकर यही करते है…’

शरजिल केवळ हिंदू समाजाबद्दल आपत्तीजनक बोलून थांबला नाही तर पुढे त्यांनी भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ, पोलीस व प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत मी भारतीय संघराज्य मानात नाही असेही विधान केले आहे. “I don’t trust Indian judiciary”, “I don’t trust Indian police”, “In total I don’t trust the Indian State today”, अशी त्याची विधाने भारतीय संघराज्याच्या अपमान करणारे व भारतीय संघराज्याबाबत घृणा निर्माण करणारे आहे जे की भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक 124A अनुसार गुन्हा आहे.

शरजिल उस्मानीला ‘एल्गार परिषद २०२१’ येथे हर्षाली पोतदारने निमंत्रित केल्याचे त्याच्याच भाषणातुन समजते. ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवार वाडा येथे आयोजित एल्गार परिषदेच्या आयोजनातही हर्षाली पोतदार सक्रिय होती.

या एल्गार परिषद – कोरेगाव भीमा हिंसाचार संबंधित विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात (CR No ०४/२०१८) हर्षाली पोतदारही एक आरोपी आहे. शरजिलवर ही यापूर्वी हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. असे असताना त्याला ‘एल्गार परिषद २०२१’ या कार्यक्रमात निमंत्रित करणे व त्याने आपल्या भाषणात हिंदू समाजाचा अपमान करून पुढे “I don’t trust the Indian State” वगैरे भारतीय संघराज्यविरोधात विधाने करणे अत्यंत संशयास्पद आहे. एल्गार परिषदेच्या माध्यमातून गेल्या कालखंडात काय झाले, याची जाणीव असताना, अशा आयोजनांना पुन्हा परवानगी देणे, किती चूक होते, हेच शरजीलच्या विधानांतून दिसून येते.

सदर प्रकरण सामाजिक ऐक्य व राष्ट्राच्या सुरेक्षेसंबंधित असल्याने योग्य तपास होणेकामी आमच्या काही मागण्या आहेत:

१. शरजिल उस्मानीला त्वरित अटक करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.

२. भारतीय संघराज्यविरोधात अत्यंत आपत्तीजनक विधान केल्याने शरजिल उस्मानी विरोधात दाखल गुन्ह्यात भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक 153A सोबतच कलम क्रमांक 124A ही लावण्यात यावे.

३. शरजिल उस्मानीला निमंत्रित करणाऱ्या ‘एल्गार परिषद २०२१’ आयोजकांवरही कठोर कायदेशीर कारवाई करावी. शरजिलवर उत्तर प्रदेश येथे हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे आणि त्याची एकूण पार्श्वभूमी संशयास्पद असताना त्याला ‘एल्गार परिषद २०२१’ आयोजकांनी भाषण देण्यास बोलाविण्यामागचा काय उद्देश होता? या कार्यक्रमामागे काही व्यापक कट होता का? याबाबत सखोल तपास करावा.

४. ‘एल्गार परिषद २०२१’ कार्यक्रमस्थळी पुस्तकांच्या स्टॉल्स वर ‘बामसेफ’शी संलग्न मूलनिवासी पब्लिकेशन ट्रस्ट तसेच अन्य प्रकाशनांची पुस्तके विक्रीस होती. यापैकी काही पुस्तकांमध्ये खोटा इतिहास व जातीय तेढ निर्माण करणारी माहिती असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत सखोल तपास करावा.

Leave a Reply

%d bloggers like this: