धक्कादायक – पोलिओ लस देताना प्लास्टिकचा तुकडा गेला बाळाच्या पोटात

यवतमाळ पाठोपाठ पंढरपूरातही धक्कादायक प्रकार

पंढरपूर, दि. 2 – यवतमाळमध्ये पोलिओ लस ऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आल्याची घटना ताजी असताना आता पंढरपूरमध्येही आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान बाळाला पोलिओ लस देताना प्लास्टिकचा तुकडा सुद्धा बाळाच्या पोटात गेला आहे. बाळाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात 31 जानेवारीला पोलिओ लसीकरणाची मोहिम राबवण्यात आली. त्या दिवशी भाळवणी इथं राहणारे माधुरी व बाबा बुरांडे हे आपल्या एक वर्षाच्या बाळाला पोलिओची लस देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून आले होते. बाळाला लस देत असताना ड्रॉपच्या बाटलीचा प्लास्टिकचा तुकडा सुद्धा बाळाच्या तोंडात गेला. तातडीने बाळाला उपचारासाठी दवाखाण्यात दाखल करण्यात आले असून बाळाची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: