राम मंदिरासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे समर्पण

पुणे, दि. २ – अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निधी संकलन अभियानाअंतर्गत समर्पण केले. पाटील यांनी समर्पण निधीचा धनादेश पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी भागाचे संघचालक दिगंबरजी परुळेकर, संभाजीनगर कार्यवाह सुधीर जवळेकर, कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनित जोशी, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, सुधीर पाचपोर आदी उपस्थित होते.

समर्पणानंतर पाटील म्हणाले की, “प्रभू श्रीराम आमचे श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीत भव्य मंदिर उभारणे हे आमचे ध्येय आहे. त्यासाठी समर्पण म्हणजे आमची श्रद्धा आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: